Views


*वृक्ष लागवड चळवळीस शंकरबापू विद्यालयाचा सहभाग*

कळंब/प्रतिनिधी 


 शहर व परिसरात पाच ऑगस्ट रोजी अकरा हजार एकशे अकरा झाडे लावण्याचा संकल्प उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी एम रमेश व कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश साबळे यांच्या संकल्पनेतून सुरू आहे.
याचाच एक भाग म्हणून हसेगाव के येथील पद्मश्री शंकरबापू माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी ट्री गार्ड बांधणीचे काम मंगळवारी केले.
यावेळी शाळेचे मार्गदर्शक तथा कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विलास पाटील, व्यापारी आनंद बलाई, संजय देवडा, डॉ अशोक शिंपले, मुख्याध्यापक परमेश्वर पालकर उपस्थित होते. 

चौकट 

ही संकल्पना आता कळंबकरांची व परीसरातील नागरीकांची चळवळ बनली असून याचाच एक भाग म्हणून हसेगाव के येथील पद्मश्री शंकरबापू विद्यालयातील विद्यार्थी व कर्मचारी यांनी आज ट्री गार्ड बांधणीचे काम केले. असाच सर्वानी सहभाग घ्यावा असे आवाहन. पोलीस निरीक्षक सुरेश साबळे यांनी केले आहे.
 
Top