*भुतपिच्छास नावा खाली अघोरी कृत्य*
*भोंदुगिरी करणारा ईसम पोलिसांच्या ताब्यात*
उस्मानाबाद/प्रतिनिधी
वाशी तालुक्यातील नांदगाव बोरी गावात जादुटोणा,करनी करतब,काळी जादू, भूत प्रेत, आदी पासून बचाव करण्याचा थाप मारुन येणाऱ्या लोकांन कडून पैसे उकलून अघोरी कृत्य करणारा भोंदू बाबास पोलिसांनी ताब्यात घेतलं.गुरुवार (दि.10) रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी कारवाई केली
सविस्तर माहिती अशी की वाशी तालुक्यातील नांदगाव बोरी शिवारातील हजरत खाँजा शेख फरीद शेकरगंज या दर्ग्याच्या शेजारी एक भोंदु बाबा येणारे लोकांना माझ्या अंगात देवी शक्ती असुन, मी जादुटोणा करणान्यापासून, भुतबाधा होण्यापासुन वाचवितो, असे सांगुन त्यांचे कडुन अघोरी कृत्य करुन घेवुन त्यांचेकडुन तंत्र मंत्र चे सामान काळया रंगाचे बाहुली यासाठी प्रत्येक व्यक्तीकडुन २०० ते ३०० रुपये घेत आहे.असल्याची माहिती कळंब पोलिस उपविभागीय अधिकारी एम. रमेश यांना गुप्त माहिती मिळाली
त्यांनी तत्काळ कळंब व वाशी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे पथक तयार करून करून सदर ठिकाणी छापा मारला असता एक इसम त्या ठिकाणी येणा-या लोकांना लिंबु, नारळ अंतर, काळया रंगाची बाहुली व मंत्र तंत्राचे सामान विकत असतांना मिळुन आला तर दुसरा इसम हा लोकांना अघोरी कृत्य करताना मिळुन आला. मिळुन आलेल्या भोंदु बाबा व सामान विक्री करणा-या इसमास त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे शहजारवली ऊर्फ अहमद पाशा सय्यद वय ३४ वर्षे रा. नांदगाव बोरी ता.वाशी जि. उस्मानाबाद व ताजोददीन अहमद शेख वय ४५ वर्षे रा. नांदगाव बोरी ता.वाशी जि. उस्मानाबाद असे सांगितले. तसेच शहजारवली ऊर्फ अहमद पाशा सय्यद (बाबा) याच्या रुममध्ये बाहेरील जिल्हयातुन दाखविण्यासाठी आलेले बाहेर पत्रयाचे शेडमध्ये इतर १० ते १५ इसम बसुन होते. यातील भोदू बाबा व मदत करणारा इसम यांच्याकडुन अघोरी उपचाराचे साहीत्य व रोख रक्कम असे ५८७५७/- पंचा समक्ष पोनि श्री. दसुरकर यांनी जप्ती पंचनामा करुन जप्त केलेले आहे.
हि कारवाई उस्मानाबाद पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक नवनीत काॅवत यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब उपविभागीय अधिकारी एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दसुरकर, पोलिस उपनिरीक्षक पुजरवाड,आर. बी घुले पोलिस नाईक सादेक शेख,पठण,पतंगे, वाशी पोलीस ठाण्याचे महिला पोलिस नाईक चाटे, पोलिस शिपाई सुरवसे,गिराम, पवार यांनी केली