*जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा!*
उस्मानाबाद/प्रतिनिधी
अंनत श्री विभूषीत जगद़गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिण पीठ नानिजधाम यांचे समस्या मर्गदर्शन व दर्शन सोहळया चे आयोजन गुरुवार दि, ३१ व १ सष्टेंबर शुक्रवार रोजी सकाळी ९ वाजता श्रीक्षेत्र माऊली माहेर मराठवाड़ा उपपीठ सिमुरगवव्हाण ता. पाथरी येथे आयोजित करन्यात आले आहेअशी माहिती मराठवाडापीठ समितीच्या वतीने देण्यात आलेली आहे. या कार्यक्रमासाठी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील सर्व निरीक्षक जिल्हाध्यक्ष सर्व तालुकाप्रमुख व सतसंग प्रमुख आरती प्रमुख कमिटीतील सदस्य मंडळी व भाविक भक्त यांनी ३१ व १ सब्टेंबर रोजी जगद्गुरु नरेंद्रचार्य जी महाराज यांचा शुभ आशीर्वाद घेण्यासाठी उपपीठ मराठवाडा सिमुरगव्हाण मठ तालुका पाथरी जिल्हा परभणी येथे उपस्थित रहावे असे आव्हान मराठवाडा पीठ समितीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे . या समस्यामार्गदर्शन व दर्शन सोहळया साठी मोठ्या संख्यने हजर राहावे ,याच बरोबर मार्गदर्शन व प्रवचन दर्शन सोहळयासाठी येणाऱ्या भगक्तगंनासाठी दि. ३१ ऑगस्ट पासून येणाऱ्या सर्व भाविकांसाठी संस्थानामार्फत महाप्रसाद वअन्नदान होणार आहे,असे अवाहन धाराशिव जिल्हा अध्यक्ष संतोष केसकर व धाराशिव जिल्हा सेवा समिती चे प्रसिध्दी प्रमुख विलास मुळीक यांनी केले आहे ,