*रोटरी क्लब कळंब याचा पदग्रहण व कळंब भूषण पुरस्कार प्रदान सोहळयाचे आयोजन*
कळंब /प्रतिनिधी
येथील रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी व इनरव्हील क्लब कळंब यांचा पदग्रहण सोहळा व कळंब भूषण पुरस्कार या कार्यक्रमाचे आयोजन साई मंगलम कार्यालय ढोकी रोड येथे रविवारी दि. ९ जुलै रोजी सकाळी ठीक ११.00 वाजता केले आहे.
रोटरी क्लब कळंबचे नूतन अध्यक्ष म्हणून सुदर्शन नारकर तर नूतन सचिव म्हणून प्रा. डॉ. साजेद अमर चाऊस हे पदभार स्वीकारणार आहेत. त्यांच्यासोबतच इनरव्हील क्लबच्या नूतन अध्यक्षा म्हणून डॉ. आकांक्षा पाटील व सचिव डॉ. जेमिनी भिंगारे हे पदभार स्वीकारतील. तसेच रोटरी परिवाराच्या वतीने दिला जाणारा 2023 चा कळंब भूषण पुरस्कार यावर्षी प्राचार्य डॉ. अशोकराव ज्ञानदेव मोहेकर यांना देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार अरविंदजी जोशी व रोटरी चे उपप्रांतपाल विनयजी जाजू हे उपस्थित राहणार आहेत तरी या समारंभासाठी जास्तीत जास्त संख्येने सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रोटरीचे माजी अध्यक्ष व सचिव डॉ सचिन पवार,डॉ. अभिजीत जाधवर व समस्त रोटरी परिवार कळंब यांच्या वतीने करण्यात आले आहे.