Views


*बस स्थानकात जाण्यासाठी सांडपाण्यातून मार्ग काढावा लागतो . दुरुस्ती न झाल्यास आंदोलन!*कळंब/प्रतिनिधी 

येथील बसस्थानकात जाण्यासाठी नागरिकांना चक्क वाहत्या सांडपाण्यातुन मार्ग काढावा लागतो. कळंब चे बस स्थानक सारखे गजबजलेले असते. येथून लांब पल्ल्याच्या गाड्यांचा सारखा धावत असतात , दररोज हजारो नागरिक एस टी बस द्वारे प्रवास करतात. कळंब स्थानकावरून शेकडो बसेसची ये जा असते. नागरीक व शालेय विद्यार्थी बस द्वारे प्रवास करतात. 
सुदैवाने कळंब बस स्टॅण्ड भले मोठे विस्तृत आहे परंतु स्वच्छतेचे तीन तेरा झाल्याचे दिसून येते. स्टॅण्ड वर जागोजागी खड्डे पडलेले असून त्यामध्ये पाणी साचलेले आहे. मुख्य प्रवेशद्वारातुन चक्क नालीचे सांडपाणी उघड्यावरून वाहत आहे. यातूनच नागरिकांना नाकाला रूमाल लाऊन जिव मुठीत घेऊन आत बाहेर ये जा करावी लागते. त्यातच जर बस अथवा इतर वाहन आले तर नागरिकांच्या अंगावर सांडपाण्याचा अभिषेक झाल्यापासून कोणीही रोखु शकत नाही. बसेस, पॅसेंजर च्या गाड्या, पॅसेंजर, रिक्षा साठी एकच प्रवेशद्वार कार्यरत आहे हे विशेष. या सांडपाण्याचा बंदोबस्त करण्यासाठी न .प . प्रशासन, एस. टी प्रशासन ना निवेदन देऊन अध्याप पर्यंत कोणत्याही प्रकारची सुधारणा झालेली दिसून येत नाही. बस स्टॅण्ड ला सांडपाण्याच्या तळ्याचे स्वरूप आलेले असुन प्रवाशांन ना या सर्व अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. पावसाळा सुरू झलेला असुन साथीचे आजार डोके वर काढू लागले आहेत. 
तरी संबंधित अधिकारी वर्गांने या गैरसोयीचा बंदोबस्त करावा अन्यथा न . प . प्रशासन आणि एस .टी . प्रशासन यांना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागेल. यात आठ दिवसात सुधारणा झाली नाही तर प्रवाशी संघटने मार्फत जागो जागी खड्यात वृक्षारोपण व वाहत्या पाण्यात कागदी नाव सोडण्याचा कार्यक्रम हाती घेतला जाईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी असे जेष्ट नागरिकांकडून , विद्यार्थी संघटना नी केले आहे .

 
Top