Views


*किशोर माळी यांचे यश प्रेरणादायी --संतोष भोजने*

*पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल किशोर माळी यांचा माळी लॅब कळंब येथे सत्कार.*

कळंब/ प्रतिनिधी 

तालुक्यातील मंगरूळ येथील श्री किशोर पांडुरंग माळी यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल गुरूवार(दि.६) श्री किशोर पांडुरंग माळी यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल कळंब येथे महात्मा फुले बचत गट व मित्रमंडळी च्या वतीने सत्कार करण्यात आला. अतिशय हलाखीच्या व कठीण परिस्थितीत, कोणत्याही प्रकारचा क्लास न लावता, किशोर मांडी माळी यांनी मिळवलेल्या यशाबद्दल उपस्थित त्यांनी त्यांचे कौतुक केले. आपल्या यशामध्ये माझा मोठा भाऊ शंतनू माळी यांचा मोलाचा वाटा असल्याचे यावेळी किशोर माळी यांनी बोलताना सांगितले. महात्मा फुले बचत गटाचे सदस्य, लता मंगेशकर शाळेचे वाघमारे सहशिक्षक श्री बोधिसत्व वाघमारे यांचाही वाढदिवस यावेळी साजरा करण्यात आला. कार्यक्रमास बचत गटाचे वरिष्ठ सदस्य मार्गदर्शक श्री टी जी माळी, सचिव अरुण माळी, राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष भोजने,प्राध्यापक लालासाहेब धोंगडे सर, अरुण शेळके सर, बिबीशन यादव आकाश माळी सागर माळी पुंडलिक करंजकर सर, सावंत नाना, शिंदे सर,गायत्री कॉम्प्युटरचे श्री श्याम जाधवर, श्री चंद्रकांत बारटक्के साहेब यांच्यासह बचत गटाचे व मित्रमंडळी सदस्य उपस्थित होते.

 
Top