Views


*रमजान ईद तर हिंदू बांधवांनी अक्षय तृतीयेचा सण मोठ्या उत्साहात साजरा*


*पोलिस प्रशासनातर्फे मुस्लिम बांधवांचा गुलाबाचे फुल देऊ शुभेच्छा उपविभागीय अधिकारी एम रमेश, कळंब पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेश साबळे यांनी दिल्या*


कळंब/प्रतिनिधी


शहरातील मुस्लिम बांधवांनी रमजान ईद तर हिंदू बांधवांनी अक्षय तृतीयेचा सण शनिवार (ता.२२) मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. 
रमजान ईद क्या निमित्ताने शहरातील मुस्लिम बांधवांनी ईदगाह आणि मर्कज मस्जिद येथे शांततेत ईदची नमाज अदा करण्यात आली. 
ईदगाह मैदानावर हिंदू बांधवांनी उपस्थित मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन शूभेच्छा दिल्या. खेळीमेळीच्या वातावरणात एकमेकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देवून दिल्या शुभेच्छा.

सर्व मुस्लिम बांधवाना ईदगाह मैदान येथील नमाज पठण स्थळ येथे जाऊन शिवाजी कापसे, सतीश टोणगे, प्रा.श्रीधर भवर, अजित पिंगळे, लक्ष्मण हुलजुते , अनंत वाघमारे, सुरेश शिंदे आदींसह शेकडो नागरिकांनी मुस्लिम बांधवांना शुभेछा दिल्या. 

दोन्ही नमाज पठणस्थानी सहाय्यक पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या मार्गद्शनाखाली कळंब पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुरेश साबळे यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 
नमाज पठण नंतर अल्पोपहरसाठी एकमेकांना आमात्रित करत होते. एकंदरीत शहर व परिसरात ईद मोठ्या उत्साहात पार पडली.

 
Top