Views


*ढोकी येथे 11 जुगारी पोलिसांच्या ताब्यात*

*अवैध देशी दारू ही जप्त*


*कळंब पोलिस उपविभागीय अधिकारी एम रमेश यांची कार्यवाही*

उस्मानाबाद/प्रतिनिधी 

तालुक्यातील ढोकी येथे अवैध दारू विक्री आणि मटका नवाचे जुगार,तिरट जुगार खेळत असल्याचे कळंब पोलिस उपविभागीय अधिकारी एम रमेश यांना खबर मिळाली. याची माहिती उस्मानाबाद पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना देत मिळालेल्या खबर ची खात्री करत ढोकी पोलीस ठाण्याचे अधिकारी,कर्मचारी तसेच कळंब पोलिस उपविभागीय अधिकारी कार्यालयचे अधिकारी कर्मचारी चे पथक बनून मिळालेल्या ठिकाणी छापे मारत 11 जणांना ताब्यात घेत कार्यवाही करण्यात आली 
याबाबत अधिक माहिती अशी की गुरूवार (दि.२०) रोजी दुपारी 4:00 वाजण्याच्या सुमारास ढोकी गावातील पेट्रोल पंप चौकात वेगवेगळ्या ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये असलेले दुकानात छापा मारत कल्याण नावाचा मटका जुगार खेळवित असणारे व्यक्ती व तिरट जुगार खेळत असलेले 1) लहु उत्तम परसे रा. ढोकी यास ताब्यात घेत त्याच्या कडून रोख 13,280/- रूपये व मटका जुगाराचे साहित्य जप्त केले. तर 2) सिध्दार्थ शिंदे रा ढोकी हा बंकट परसे यांच्या सांगण्यावरून मटका जुगार खेळवित असताना मिळून आला त्याच्या ताब्यातुन रोख रक्कम 620/- रुपये व मटका जुगाराचे साहित्य जप्त केले तसेच त्याच्या जवळ देशी टॅंगो पंच दारू च्या 15 बाटल्या अंदाजे किंमत 1050/- रूपये हे जप्त केले. तर 3) दिलीप कोळी व 4)रामा नाना कोळी रा ढोकी हे ही कल्याण नावाचे जुगार खेळवित असताना मिळून आले त्यांना ताब्यात घेत त्यांच्या कडून रोख रक्कम 2860/- रूपये व मटका जुगाराचे साहित्य जप्त करत त्यांच्या जवळील दोन मोबाईल अंदाजे किंमत 20,000/- रूपये किंमतीचे जप्त केले. तर 5)व्यंकट श्रीरंग लोमटे व 6) आयुब बाबुमिया शेख रा. ढोकी यांना ताब्यात घेत त्यांच्या कडून रोख रक्कम 2110/- रूपये दोन मोबाईल फोन अंदाजे किंमत 9,000/- रुपये व मटका जुगाराचे साहित्य जप्त केले. तसेच तिरट जुगार खेळत व खेळवित असताना 7) सुनील लाला काळे 8) बबन रामदास चव्हाण 9) शिवाजी चिवळा चव्हाण तिघे रा. ढोकी यांना ताब्यात घेत रोख रक्कम 3580/- रूपये व दोन मोबाईल अंदाजे किंमत 17,000/- रूपये व जुगाराचे साहित्य जप्त केले तर 10) गणा उजण्या काळे रा ढोकी यास ताब्यात घेत त्याच्या कडून गावठी हातभट्टी दारू 10 लिटर चे कॅन्ड अंदाजे किंमत 600/- रूपये जप्त करत ताब्यात घेतले आशी पोलिसांनी कारवाई करण्यात 70,100 रुपये चे मुद्देमाल जप्त करत 11 जणांना वर कलम 12(अ) व 65 ई नुसार ढोकी पोलीस ठाण्यात वेगवेगळे 5 गुन्हे दाखल करण्यात आले.
सदर कार्यवाही ही उस्मानाबाद पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक नवनीत काॅंवत, यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब पोलिस उपविभागीय अधिकारी एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब पोलिस उपविभागीय पथकातील पोलिस उपनिरीक्षक गंगाधर पुजरवाड, पोलीस नाईक सादेक शेख, नवनाथ खांडेकर, किरण अंभोरे, किरण भांगे, अनिल मंदे, विठ्ठल गरड, पांडुरंग राऊत यांच्या सह ढोकी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस उपनिरीक्षक राजाभाऊ सातपुते, बालाजी गिरी, पोलीस नाईक श्रीमंत क्षिरसागर, महेश शिंदे, आदींनी केली 
 
Top