Views


*पोलिसांनी अवैध गावठी हातभट्टी दारू चे अड्डे उध्वस्त केले*


*3 महिलांना ताब्यात घेत गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे साहित्य केले जप्त*


*कळंब पोलिस उपविभागीय अधिकारी एम रमेश यांची कार्यवाही*


कळंब/प्रतिनिधी

शहरातील जुनी दुध डेअरी चव्हाण काॅमपलेक्स पाठीमागे एक महिला अवैध गावठी हातभट्टी दारू बनवून विक्री करत असल्याची गुप्त माहिती कळंब पोलिस उपविभागीय अधिकारी एम रमेश यांना याची गांभीर्याने घेत शुक्रवार(दि.21) रोजी संध्याकाळी कळंब पोलिसांनी छापा मारत अनुसया सचिन ऊर्फ संतोष काळे (वय 25) रा. चव्हाण कॉम्पलेक्स च्या पाठीमागे जुनी दुध डेअरी पारधी पिढी कळंब महिलेस ताब्यात घेत त्याच्या कडून गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी ठेवलेले 530किलो अवैध नवसागर व 100 लिटर बॅरेल मध्ये आंबट उग्र वासाचे गावठी हातभट्टी दारू बनविण्यासाठी लागणारे गुळमिश्रीत रासायन असे अंदाजे किंमत 22,750/- रुपये चे मुद्देमाल जप्त केला
          दुसऱ्या दिवशी शनिवार (दि.22) रोजी सकाळी त्याच ठिकाणी व मार्केट यार्ड येथे छापा मारत अवैध गावठी हातभट्टी दारू तयार करून विक्री करणारी आशाबाई तानाजी पवार (वय.65)रा मार्केट यार्ड येथे घरावर छापा मारून यास ताब्यात घेत अवैध गावटी हातभट्टी दारु तयार करण्यासाठी ठेवलेला गुळ मिश्रीत रसायन व गावठी हातभट्टी दारु मिळुन आला. १) २०,०००/ रु. किंमतीचे एक निळया रंगाच्या २५० लिटरच्या बॅरेलमध्ये प्रत्येकी २५० लिटर फसफसते आंबट उग्र
वास येत असलेले गुळमिश्रीत रसायन प्रति लिटर ४० रुपये प्रमाणे. ६,०००/ रु. किमतीचे एक निळया रंगाच्या १५० लिटरच्या बॅरेलमध्ये १५० लिटर फसफसते अंबट उग्र वास येतअसलेले गुळमिश्रीत रसायन प्रति लिटर ४० रुपये प्रमाणे. ३) १०००/ रु. किंमतीचे एका निळया रंगाच्या ५० लिटरच्या कंडमध्ये २० लिटर अंबट उग्र वास येत असलेले गावठी हातभट्टी दारु प्रति लिटर ५० रुपये असे एकुण २७,०००/- रुपयेचा मुद्देमाल मिळुन आले.
            जुनी दुध डेअरी कळंब येथे छापा मारला असता तिथे अवैध गावटी हातभट्टी दारू तयार करुन विक्री करणारी महीला शिला शिवा पवार वय ३७ वर्षे रा. जुनी दुध डेअरी कळंब हीच्या पत्र्याचे घराचे समोर तिच्या ताब्यात खालीलप्रमाणे अवैध गावटी हातभट्टी दारु तयार करण्यासाठी ठेवलेला गुळ मिश्रीत रसायन व गावठी हातभट्टी दारु जप्त करण्यात आले असे १०,०००/ रु. किंमतीचे एक निळया रंगाच्या २५० लिटरच्या बॅरेलमध्ये २५० लिटर फसफसते आंबट उग्र वास येत असलेले गुळमिश्रीत रसायन प्रति लिटर ४० रुपये प्रमाणे ५००/ रु. किंमतीचे दोन पांढ-या रंगाच्या ०५ लिटरच्या कॅडमध्ये प्रत्येकी ०५ लिटर अंबट उग्र वास येत असलेले गावठी हातभट्टी दारु एकुण १० लिटर प्रति लिटर ५० रुपये प्रमाणे.असे एकुण १०, ५००/- रुपयेचा मुद्देमाल मिळुन आले. असे एकुण तीन ठिकाणी कळंब शहरात छापा मारला असता छाप्यात अवैध गावठी हातभट्टी दारु तयार करण्याचे
नवसागर, गुळमिश्रीत रसायन व गावठी हातभट्टी दारु असे एकुण किंमत ६०२५०/- रु. मुद्देमाल मिळुन आलेने ०३ महीला आरोपीतांवर वेगवेगळे तीन गुन्हे कळंब पोलिस ठाण्यांत दाखल करण्यात आले आहेत गावठी हातभट्टी दारू चे अड्डे उध्वस्त करून ते नष्ट केले 
 सदर कार्यवाही ही उस्मानाबाद पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशाने कळंब पोलिस उपविभागीय अधिकारी एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गंगाधर पुजरवाड, पोलिस उपनिरीक्षक रामहरी चाटे, सहायक पोलिस उपनिरीक्षक विजय अतकरे, महिला पोलिस नाईक प्रतिभा मते, नवनाथ खांडेकर, श्रीकांत भांगे, किरण अंभोरे, अमोल राऊत यांनी केलं


 
 
Top