Views


*देशी पिस्तूल घेऊन फिरणारा तरूण ताब्यात*


*स्थानिक गुन्हे शाखेने केली कारवाई*


धाराशिव/प्रतिनिधी


देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिंवत काडतुस जवळ बाळगुन फिरणाऱ्या 34 वर्षीय तरूणाला धाराशिव (उस्मानाबाद) च्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई रविवार (दि.16)रोजी सायंकाळी चिखली चौरस्ता येथे करण्यात आली असून बेंबळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


धाराशिव ( उस्मानाबाद) तालुक्यातील चिलवडी येशील किशोर लिंबराज माळी (वय.34) हा तरुण चिखली चौरस्ता भागात वावरत होता. त्याच्या कमरेला देशी बनावटीचे पिस्तूल असल्याचे खबर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक यशवंत जाधव यांना मिळाली. त्यांनी याची गांभीर्याने दखल घेत आपल्या पथकासह तातडीने

चौरस्ता येथे दाखल होत मिळालेल्या माहिती च्या वर्णनाच्या तरुणांचा शोध घेऊन माहितीची खात्री करत संबंधित तरुणाकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास ताब्यात घेत तरुणाची चौकशी केली असता तो चिलवडी येथील असल्याचे निष्पन्न झाले त्याच्याकडील 15,500 /- रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल तसेच एक जिवंत करतुस जप्त करून आरोपीला बेंबळी पोलीसांच्या ताब्यात दिले त्याच्या विरोधात शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आले दरम्यान आरोपीने पिस्तूल कोठून आणले चिखली चौरसता भागात फिरण्याचे कारण या पिस्तूलचा वापर करण्याचा हेतू या संबंधित माहिती चौकशी निष्पन्न करण्याचे काम सुरू असल्याचे स्थानिक गणेशाचे पोलीस निरीक्षक यांनी सांगितले सदरची कारवाई ही धाराशिव (उस्मानाबाद) चे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक नवनीत काॅंवत, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव, पोलिस उपनिरीक्षक संदीप ओहोळ, पोलिस अंमलदार विनोद जानराव, फरहान पठाण, यांनी केली 
 
Top