Views

*महात्मा बसवेश्वर सामाजिक समता- शिव पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन*

धाराशिव/प्रतिनिधी

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता- शिव पुरस्काराकरिता नियमावली बाबतचा शासन निर्णय दिनांक 08 मार्च 2019 रोजी निर्गमित करण्यात आला आहे या शासन निर्णयान्वये विरशैव-लिंगायत समाजाठी सामाजिक, शैक्षणिक,कलात्मक,समाज घटनात्मक आध्यात्मिक प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात कार्य करणा-या व्यक्तीच्या व संस्थाच्या कामाची दाद / दखल घ्यावी व इतरांना त्यापासून प्रेरणा मिळावी जेणेकरून या समाजातील समाजसेवक कलावंत समाज संघटनात्मक कार्यकर्ते आध्यात्मिक प्रबोधनकार साहित्यिक सरसरवून पुढे यावेत या करीता व्यक्तीसाठी एक व सामाजिक संस्थासाठी एक असे एकूण दोन पुरस्कार देण्यात येणर आहे.
सदरहू पुरस्कार  2022-23 या वर्षासाठी देण्यात येणार असल्याने सर्व व्यक्ती व संस्था यांनी रितसर प्रस्ताव सादर करावेत तसेच हे प्रस्ताव दि. 23 मार्च 2023  पर्यत सादर करावे.
तरी इच्छूक व्यक्ती व संस्था यांनी उपरोक्त पुरस्कारासाठीचे प्रस्ताव सहाय्यक आयुक्त समाजकल्याण  यांच्यकडे दि. 23 मार्च 2023 पर्यंत सर्व कागदपत्रासह करावेत असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, बी.जी.अरवत यांनी केले आहे.

 
Top