Views

*शेतकऱ्यांसाठी “मोठी बातमी” हरभरा खरेदी नोंदणीला 31 मार्चपर्यंत मुदतवाढ खरेदी प्रक्रीया 11 जून पर्यंत सुरू राहणार:जिहाधिकारी डॉ.ओम्बासे*


धाराशिव/ प्रतिनिधी 


  नाफेडमार्फत हरभरा खरेदी नोंदणीला 31 मार्चपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. यापूर्वी ही मुदत 15 मार्च रोजी संपुष्टात येणार होती. असंख्य शेतकरी नोंदणीपासून वंचित राहू नये यासाठी शासनाने  हरभरा खरेदीच्या नोंदणीला मुदतवाढ दिली असून खरेदी प्रक्रीया 11 जून 2023 पर्यंत सुरू राहणार आहे.असे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी सांगितले.
जिल्ह्यात नाफेडमार्फत 11 तसेच महा एफपीसी मार्फत सहा ठिकाणी खरेदी केंद्र कार्यन्वित करण्यात आले आहेत. आजपासून खरेदी प्रक्रीया सुरू झाली आसून 11 जून 2023 पर्यंत सुरू राहणार असेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले. 
नाफेडमार्फत उस्मानाबाद तालुका शेतकरी सहकारी संघ लिमिटेड उस्मानाबाद, तुळजापूर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ तालुका तुळजापूर, श्री. शिवाजी भूम तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ, एकता खरेदी विक्री सहकारी संस्था उस्मानाबाद खरेदी केंद्र कळंब, वाशी तालुका शेतकरी सहकारी संघ लिमिटेड. वाशी, वसुंधरा ऍग्री फार्मसी प्रोड्युसर कंपनी लिमिटेड कनगरा खरेदी केंद्र लोहारा, विविध कार्य सेवा सहकारी संस्था लि. गुंजोटी खरेदी केंद्र गुंजोटी, श्री.स्वामी समर्थ सर्व सेवा सहकारी संस्था मर्या गुंजोटी खरेदी केंद्र उमरगा, तनुजा महिला शेतकरी व शेतीपूरक सेवा पुरवठा सहकारी संस्था सोन्नेवाडी खरेदी केंद्र इट, तसेच लोहारा येथील कानेगाव आणि भूम येथील सोनी वाडी असे अकरा ठिकाणी नाफेडच्या खरेदी केंद्र कार्यान्वित करण्यात आले असल्याचे जिल्हा पणन अधिकारी हरिदास भोसले म्हणाले.
महाएफपीसीमार्फत उस्मानाबाद जिल्ह्यात 6 ठिकाणी खरेदी केंद्र कार्यान्वित करण्यात आले असल्याचे महाएफपीसीचे जिल्हा समन्वयक भागवत कवडे म्हणाले. यामध्ये (1) अजिंक्य एफपीसी कवडेवाडी (2) भैरवनाथ एफपीसी गौर (3) गणराज्य एफपीसी खामगाव (4) परफेक्ट नॅचरल एफपीसी सकनेवडी (5) तुळजापूर एफपीसी, तुळजापूर (6) गुंजोटी एफपीसी उमरगा या खरेदी केंद्रांचा समावेश आहे.

 
Top