Views


*काचबिंदू आजाराविषयी जनजागृती होणे आवश्यक अधिष्ठाता डॉ. शिल्पा दोमकुंडवार*

धाराशिव/ प्रतिनिधी 

काचबिंदु आजाराचे लक्षण हे सहसा ओळखता येत नसल्याने रुग्णांनी वेळोवेळी तज्ज्ञांमार्फत नजीकच्या शासकीय आरोग्य केंद्रामध्ये उपचार करणे गरजेचे आहे, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविदयालयाच्या अधिष्ठाता डॉ शिल्पा दोमकुंडवार यांनी जागतिक काचबिंदु सप्ताहाच्या उदघाटन प्रसंगी केले.
   शासकीय वैद्यकीय महाविदयालय रुग्णालय व राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम जिल्हा रुग्णालय यांच्या वतीने दि 12 मार्च ते 18 मार्च 2023 दरम्यान LETS BEAT INVISIBLE GLAUCOMA या घोषवाक्यातंर्गत जागतिक काचबिंदु सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त दि.13 मार्च 2023 रोजी नेत्र विभाग, येथे काचबिंदु सप्ताहाच्या उदघाटनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात डॉ.भालचंद्र यांच्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात नेत्र शल्य चिकित्सक डॉ.महेश पाटिल यांनी जागतिक काचबिंदु सप्ताहादरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये नेत्रतपासणी शिबीरे, आकाशवाणी केंद्रावर मुलाखत, शालेय व महाविद्यालयीन स्तरावर चर्चासतत्रांचे आयोजन करण्यात येणार असल्याबाबत माहिती दिली. या वेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ.तानाजी लाकाळ यांनी काचबिंदु होण्याचे कारण, काचबिंदु होऊ नये म्हणुन घ्यावयाची काळजी, काचबिंदुचे समाजात वाढत असलेले प्रमाण तसेच वय वर्ष 40 नंतर प्रत्येक व्यक्तीने व ज्या व्यक्तीला मधुमेह हा आजार आहे अशा व्यक्तीनी किमान सहा महिण्यातुन एकदा तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत डोळ्यांची तपासणी करुन घ्यावी, जेणेकरुन काचबिंदुचे लवकर निदान करुन त्यावर योग्य उपचार करुन काचबिंदुमुळे येणारे अंधत्व नियंत्रणात ठेवता येऊ शकते याबाबत मागदर्शन केले. यावेळी रुग्णालया अंतर्गत मरणोत्तर नेत्रदान केलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांचे प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच नेत्रविभागाकरिता वेळोवेळी मदत व सहकार्य करणा-या समता फांउडेशन, औरंगाबाद यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ. शिल्पा दोमकुंडवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आर.व्हि.गलांडे हे होते यावेळी अधिक्षक डॉ.तानाजी लाकाळ, तसेच नेत्रविभागाचे प्रमुख नेत्रशल्यचिकित्सक डॉ.विरभद्र कोटलवाड, डॉ.सुखदेव राठोड, डॉ.महेश पाटील, डॉ. मुस्तफा पल्ला, डॉ. पवन महाजन, अधिसेविका सुमित्रा गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच नेत्रचिकित्सा अधिकारी बाळासाहेब घाडगे, रामराजे बिडवे, निलेश कुरील, नेत्रविभागचे इन्चार्ज वहिदा शेख सर्व नर्सिंग स्टाफ, समुपदेशक उमेश गोरे, रुग्णालयीन कर्मचारी व रुग्णालयात तपासणीकरिता आलेले रुग्ण व नातेवाईकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आभार नेत्रशल्यचिकित्सक डॉ.विरभद्र कोटलवाड यांनी केले तर सुत्रसंचलन श्री संतोष पोतदार यांनी केले. 

 
Top