*कळबं बसस्थानकात पॉकेटमाराचां धूमाकुळ. ५ हजार रूपये लांबवले.*
कळंब /प्रतिनिधी
शहरातील बसस्थानकात दिवसेने दिवस रोडरोमीओ ,पॉकेटमार ,भूरटया चोऱ्या, हाणामाऱ्याच्या प्रमाणात मोढी वाढ झाली आहे.
यातच सोमवार दि ६ फेब्रुवारी रोजी कळंब बसस्थानकात दिलीप मारुती पवार हे काही कामानिमित बारामतीला परळी कळंब बारामती बस क्र एम एच .१४ डी .३१७५ या बस मध्ये चढत असतांना भर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दिलीप पवार रा. कळंब यांच्या च्या खिशातील सुमारे ५ हजार २७० रूपये रोख व एटीएम ,अधारकार्ड ,पॅनकार्ड सह इतर कागद पत्रे चोरांनी हातोहात हानुन पोबारा केला.या प्रकरणी कळंब पोलीसात रात्री ७ पर्यंत गुन्हा नोंद झाला नाही .
कळंब बस स्थानकावर सणाच्या दिवशी व गर्दीच्या हंगामात कायम स्वरूपी दोन पोलीसाची नेमनूक करावी असा सवाल प्रवाशातून होत आहे,
सध्या उन्हाळ्याच्या दिवसाची चाहूल सुरु होत आसून महीला वर्ग व नौकरदार वर्ग मोठया प्रमाणात घराबाहेर पडत असतात ,याचा फायदा रोडरोमीओ ,पॉकेटमार ,टवाळखोर,यांनी तर चौकाचौकात ठाण मांडले आहे ,बसस्थानकावर तर टवाळखोरोनी हदच सोडली आहे ,शहरात ढोकी रोड,मोहा रोड,बसस्थानक परिसर परिसात यांचा हौदोस दररोज चालू आहे ,
कळंब पोलीस प्रशासनात चिडीमार पथक नुसते कागदावरच आहेत .बस स्थानकात जर काही प्रकार घडले तर फोनच करावा लागतो ,पोलीस येई पर्यंत टवाळखोर पसार होतात ,दर सोमवारी तर अशा घटना घडत असतात पोलीस म्हणतात मोठे शहर आहे ,कर्मचारी कमी,तान जास्त आहे,अशी गत पोलीसांची झाली आहे ,या कडे उपविभागीय पोलीस अधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुखांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.