*कठीण प्रसंगावर मात करून जीवनात यशस्वी व्हा :- डॉ.अशोकराव मोहेकर*
कळंब/ प्रतिनिधी
विद्यार्थ्यांनी येणाऱ्या प्रत्येक कठीण प्रसंगावर मात करून स्पर्धेच्या युगात यशस्वी व्हा,आपल्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांना ओळखून ज्या विषयाची आवड आहे त्यावर आधारीत ध्येय निश्चित केले पाहिजे. नवीन कांहीतरी कराल तरच टिकाल आणि त्यामध्येच आपले करिअर घडविले पाहिजे, असे मत ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांनी पारितोषिक वितरण प्रसंगी व्यक्त केले.
शैक्षणिक वर्ष- (२०२२-२३) शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात वार्षिक स्नेह संमेलन दि.३ ते ४ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजित करण्यात आले होते.
यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ.सुनिल पवार, सिनेट सदस्य डॉ.संजय कांबळे, उपप्राचार्य डॉ. सतीश लोमटे, डॉ.हेमंत भगवान, पंडित पवार अंतर्गत गुणवत्ता मूल्यांकन कक्ष प्रमुख डॉ.कमलाकर जाधव (आयक्यूएसी) प्रभारी प्राध्यापक प्रा.एन.एम.अंकुशराव यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे डॉ.अशोकराव मोहेकर म्हणाले, पुढे ते म्हणाले, महाविद्यालयीन तरुणांनी जीवनात विविध आदर्श बाळगणे आवश्यक आहे. आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये टिकायचे असेल तर
जो या स्पर्धेमध्ये नवीन आणि इतरापेक्षा वेगळे करण्याचा प्रयत्न करेल तोच यशस्वी होईल. स्पर्धेच्या युगात न डगमगता आपलं ध्येय निश्चित करा आणि खूप खूप मोठे होऊन देशाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक विकासात योगदान द्या, असेही मत त्यांनी मांडले.
स्नेह संमेलन निमित्ताने पाककला, मेहंदी, रांगोळी, वक्तृत्व, वादविवाद
,काव्यवाचन,मूक अभिनय, वैयक्तिक नृत्य, विनोदी अभिनय, वैयक्तिक गीत व समूह नृत्य इ. स्पर्धेतून सामाजिक सद्भावना संस्कार, मतदार जनजागृती, अंधश्रध्दा निर्मूलन, देशभक्ती अशा विषयांवर प्रकाश टाकण्यात आला. यावेळी स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय पारितोषिक तसेच उत्कृष्ट वाचक म्हणून प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी यांना तर शेख महेक जावेद (बी.ए.प्रथम वर्ष) तसेच उत्कृष्ठ अभिनय विद्यार्थी- विद्यार्थिनी श्री ओंकार (बी.कॉम.तृतीय) तोडकर व कु.साक्षी तोष्णीवाल (बी.कॉम.तृतीय) तसेच उत्कृष्ट एन.सी.सी., एन.एस.एस.कडेट्स,स्वयंसेवकानाही प्रमाणपत्र व स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक पूज्य ज्ञानदेव मोहेकर गुरूजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
प्रास्ताविक प्राचार्य डॉ. सुनील पवार यांनी, क्रीडा विभाग संचलन श्रीमती वायभसे यांनी सू्त्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. डॉ. दीपक सूर्यवंशी यांनी तर उपस्थितांचे आभार प्रा.एन.एम.अंकुशराव
मानले तसेच प्रो.डी.एन.चिंते, प्रो.दादाराव गुंडरे, डॉ.गणेश पाटील, डॉ. विश्वजीत मस्के, डॉ. बाबासाहेब सावंत, डॉ.संदीप महाजन, प्रा.ईश्वर राठोड, लेफ्टनंट डॉ. पावडे के डब्ल्यू, डॉ. विश्वजित मस्के, प्रा.नवनाथ करंजकर, प्रा.महेश मडके, प्रा. सुरज गपाट, प्रा. राहुल भिसे, प्रा. ईश्वर राठोड, डॉ. नामानंद साठे, डॉ. आर. व्ही.ताटीपामुल, प्रा. शाहरुख शेख, प्रा.गणेश आडे, श्रीमती डॉ. व्ही. टी. सरवदे, प्रा. प्रताप शिंदे डॉ.श्रीकांत भोसले, प्रा.अर्चना मुखेडकर, प्रा. शाहरुख शेख, डॉ.मीनाक्षी जाधव,ग्रंथपाल प्रा.अनिल फाटक,
श्री अरविंद शिंदे, अर्जुन वाघमारे, संतोष मोरे, संदीप सूर्यवंशी आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते, स्नेहसंमेलन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक श्री पुजरवाड आणि श्री किरण अंभोरे (पोलिस प्रशासन) तसेच प्रबंधक श्री हनुमंत जाधव, श्री.पी. एल. गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.