Views


*मुख्याध्यापका कडून मुख्याध्यापकाने घेतली 300 रूपये लाच*

*लाचखोर मुख्याध्यापक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात*

उस्मानाबाद/प्रतिनिधी

खात्यात जमा झालेल्या वेतनाचे व अनुदानाचे ऑडिट करण्यासाठी  जि.प.केंद्रीय शाळा  मुलांची तेरखेडा ता.वाशी ,जि.उस्मानाबाद (वर्ग-3) चे मुख्याध्यापक भारत रामभाऊ भालेकर वय 58 वर्ष , जि.प.केंद्रीय शाळा , तेरखेडा ता.वाशी जि.उस्मानाबाद येथील मुख्याध्यापकास बुधवार ( दि.08) रोजी 300 रूपये ची लाच घेताना उस्मानाबाद लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले
तक्रारदार हे मुख्याध्यापिका असून मुख्याध्यापकाच्या खात्यावर जमा झालेल्या वेतनाचे व अनुदानाचे ऑडिटर कडून लेखापरीक्षण करून देण्यासाठी वर नमूद आलोसे यांनी 300  रुपये लाचेची मागणी करून लागली स्वीकारण्याचे मान्य केले व स्वतः 300 रुपये लाच रक्कम पंच साक्षीदार यांचे समक्ष स्विकारताना उस्मानाबाद लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले
सदर कार्यवाही ही औरंगाबाद लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, उस्मानाबाद लाचलुचपत विभागाचे अधिक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक विकास राठोड, पोलिस अंमलदार ईफ्तेकार शेख, मधुकर जाधव, सचिन शेवाळे यांनी केली

*लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर खालील नंबरवर संपर्क साधावा*

मा. संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद.मो.न.9923023361

मा.विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. औरंगाबाद. मो. न.8788644994

मा. प्रशांत संपते , पोलीस उप अधीक्षक,ला.प्र. वि. उस्मानाबाद मो.न.9527943100

विकास राठोड, पोलीस निरीक्षक,ला.प्र. वि. उस्मानाबाद मो.न.7719058567

*कार्यालय 02472 222879*
टोल फ्री क्रमांक.1064

 
Top