Views


*तुळजापूर शहरात चक्री नावाच्या जुगार अड्डा वर छापा*

*तीन ठिकाणाहून 12 जणांना ताब्यात घेत 2,37,400/- रुपयांचे मुद्देमाल जप्त*


उस्मानाबाद/ प्रतिनिधी

तुळजापूर शहरातील बसस्थानक परिसरातील क्रांती चौकात असलेल्या सिध्दी लाॅजच्या बाजूला असलेल्या रूममध्ये चालू असलेल्या चक्री नावाचा जुगार अड्डावर मंगळवारी (दि.०७) रोजी चार वाजता पोलिसांनी छापा टाकून 1. महेश नानासाहेब भोसले,. 2. दिनेश नानासाहेब भोसले,. दोघे रा. क्रांती चौक, 3. सुधीर अर्जुनसिंग ठाकूर,रा.टाकविकी ता. तुळजापूर, 4. सुरेश कोंडीबा घाडगे, रा. वेताळ नगर तुळजापूर. यांना चक्री नावाचा जुगार खेळताना ताब्यात घेऊन रोख रक्कम रुपये 35,320/- व जुगाराचे साहित्य अंदाज किंमत रक्कम रुपये 1,03,100/- जप्त करून ताब्यात घेतले
         व जुन्या बसस्थानक परिसरातील सागर हाॅटेलच्या पाठीमागे असलेल्या रूममध्ये संध्याकाळी पाच वाजता छापा मारत चक्री नावाचा जुगार खेळणारे 1. अनिल मरगु पवार, रा.वडार गल्ली घाटशिळ रोड तुळजापूर,. 2. अहमद जाफर शेख, रा. शुक्रवार पेठ तुळजापूर,. 3. समाधान रमेश धुमाळ, रा. खंडाळा ता. तुळजापूर यांना ताब्यात घेत त्यांच्या कडून रोख रक्कम रुपये 20,460/- व जुगाराचे साहित्य अंदाजे किंमत 38,000/- रुपये जप्त केले
           तसेच जुन्या बसस्थानक परिसरातील जंगदबा टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स च्या कार्यालयामागील रुममध्ये सहा वाजण्याच्या सुमारास छापा मारून
1. मयूर मधुकर काळे,. रा. राम मंदिर परिसर जिंतूर ता. जिंतूर जि. परभणी,. 2. लक्ष्मण ज्ञानदेव माळी,. रा. अपसिंगा ता. तुळजापूर,. 3. आकाश प्रकाश पवार,. रा. सारोळा ता.तुळजापूर,. 4. अजित अशोक कांबळे,. रा. मातंग नगर शुक्रवार पेठ तुळजापूर,. 5. विश्वजीत पोपट कांबळे,. रा. ढेकर ता. तुळजापूर यांना चक्री नावाचा जुगार खेळताना ताब्यात घेत त्यांच्या कडून रोख रक्कम रुपये 18,820/- व जुगाराचे साहित्य अंदाजे किंमत 1,700/- मुद्देमाल जप्त केला असे तुळजापूर शहरात तीन ठिकाणी छापा मारत एकूण 2,37,400/- रुपये चे मुद्देमाल जप्त करून 12 जुगारी वेगवेगळे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहे.  

सदर कार्यवाही ही उस्मानाबाद पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशाने कळंब पोलिस उपविभागीय अधिकारी एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पुजरवाड, पोलिस अंमलदार सादीक शेख,. नवनाथ खांडेकर,. श्रीकांत भांगे,. विठ्ठल गरड,. किरण अंभोरे यांनी केली . या कार्यवाही ने तुळजापूर शहरातील परिसरातील अवैध धंदे माफिया मध्ये दहशत निर्माण झाली आहे. 
 
Top