Views


*तालुका विधी सेवा समिती लोहारा व विधिज्ञ मंडळ लोहारा यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी न्यायालय क.स्तर लोहारा येथे मा.श्रीमती अंजु शेंडे जिल्हा न्यायाधीश यांच्या शुभहस्ते ई फायलिंग,ई ग्रंथालय,ई -मुद्देमाल,व ई-पेमेंट तसेच ई न्यालयाचे उदघाटन*

लोहारा/प्रतिनिधी

 तालुका विधी सेवा समिती लोहारा व विधिज्ञ मंडळ लोहारा यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी न्यायालय क.स्तर लोहारा येथे दि.2 जानेवारी 2023 रोजी मा.श्रीमती अंजु शेंडे,प्रमुख जिल्हा न्यायाधीश उस्मानाबाद यांच्या शुभहस्ते ई फायलिंग,ई ग्रंथालय,ई- मुद्देमाल,व ई-पेमेंट तसेच ई न्यालयाचे उदघाटन करण्यात आले.यावेळी गुप्ता मा.जिल्हा न्यायाधीश -1उस्मानाबाद,मा. एम‌.एम.निकम,दिवाणी न्यायाधीश क स्तर,तुळजापूर तसेच लोहारा विधीज्ञ मंडळ लोहाराचे अध्यक्ष एम.यु.जट्टे,व सर्व विधीज्ञ,न्यायालयातील सर्व कर्मचारी हजर होते.यावेळी मा. प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांनी सर्वांना मार्गदर्शन करत सांगितले की,ई फाइलिंग करूनच यापुढे प्रकरण न्यायालयात दाखल करावीत, यामुळे त्यांचा वेळ,पैसा,तर वाचेल याबरोबरच कागदाची मोठ्या प्रमाणात बचत होऊन पर्यावरण संरक्षण जे सर्वाचे मुलभुत कर्तव्य आहे व जी काळजी गरज आहे ते पार पडणार आहे.तसेच केस मध्ये न्यायालयाचे काय कामकाज आज झाले आहे ते पक्षकार यांना कळनार आहे,त्यामुळे कामकाजात अधिक प्रमाणात पारदर्शकता निर्माण होऊन,लोकांचा विश्वास अधिक प्रमाणात वाढणार आहे.तसेच फौजदारी कारवाई मध्ये तपासाअंती पोलीसांनी दोषारोप ई फायलीग प्रनालीचा वापर करून दाखल केल्याने तात्काळ केस दाखल होऊन पीडित व्यक्तीला न्याय मिळण्यास विलंब होणार नाही. असे सांगितले व ई फायलीग बाबत मार्गदर्शन केले.

 
Top