Views





*मोहेकर महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले युवतीमंच ची स्थापना* 


कळंब/प्रतिनिधी


 मुलींसाठी साक्षरतेचे वाट प्रकाशमान करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती, शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेंकर महाविद्यालय ,कळंब आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 4/01/2023 रोजी उत्साहात साजरी करण्यात आली ,जयंतीनिमित्त 'महिलांचे आरोग्य 'या विषयावर प्रमुख वक्ते म्ह्णून डॉ .शिल्पा ढेंगळे यांचा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता ,त्यात त्यांनी शारीरिक विकास झाला तरच मानसिक विकास होतो आणि त्यासाठी समतोल आहार ,महिलांचे आरोग्यविषयक प्रश्न यावर संवाद साधला ,तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.अंजली मोहेकरआणि डॉ. वर्षा सरवदे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर मोलाचे मार्गदर्शन करून आधुनिक काळातील सावित्रीची भूमिका काय आहे यावर प्रकाश टाकला. या निमित्ताने महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांची वेशभूषा केली होती, याप्रसंगी महिलांना विचारपीठ मिळावे,वैज्ञानिक आणि नैतिक दृष्टीकोन निर्माण व्हावा यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले युवती मंच चे उदघाटन करण्यात आले ,यासाठी कनिष्ठ आणि वरिष्ठ विभागातून पदाधिकारी ,आणि समन्वयक यांची निवड करण्यात आली. या मंचाच्या वतीने महाविद्यालयातील राष्ट्रिय स्तरावर विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांनीचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुनील पवार सर यांनी स्त्री पुरुषसमानता जेवढी महत्वाची आहे तितकीच स्त्री पुरुष संवेदना पण महत्वाची आहे हे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा . मुखेडकर ,कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जाधव आणि आभार डॉ.उंदरे यांनी मांडले ,याप्रसंगी अलका मोहेंकर,छाया शिंदे,प्रा.वायभसे, प्रा.कदम,प्रा.कांबळे,प्रा.अडसूळ, प्रा.पाटील,प्रा.खंडागळे,प्रा.खोसे, प्रा.टिपरसे,श्रीमती अंबिरकर,श्रीमती लिमकर,श्रीमती पाडोळे,श्रीमती मडके तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होते ,


 
Top