Views


*इंधन बचत करणे एक काळाची गरज - पोलीस उपनिरीक्षक रामहरी चाटे* 
 
*कळबं आगारात इंधन बचत मोहिमेचा शुभारंभ!*


कळंब /प्रतिनिधी 

 सध्याच्या काळामध्ये इंधन बचत करणे ही एक काळाची गरज आहे .इंधन बचत करून राष्ट्र विकासाला हातभार लावावा असे मत कळंब पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलिस उप निरीक्षक रामहरी चाटे यांनी व्यक्त केले . येथील बस आगारात राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने दि १६ जानेवारी ते १५ फ्रेबुवारी या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या इंधन बचत मोहिमेचा शुभारंभ दि . १६ रोजी कळंब आगारात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला . या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आगार व्यवस्थापक मुकेश कोमटवार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कळंब पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस उप निरीक्षक रामहरी चाटे , कळंब तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास मुळीक , प्रा. मोहन जाधव ,स्थानक प्रमुख बालाजी मुळे, कार्यशाळा अधिक्षक बालाजी भारती आदी उपस्थित होते यावेळी राज्य परिवहन महामंडळामध्ये कर्मचाऱ्यांनी इंधनाची बचत करून प्रत्येक आगार तोट्यातून नफ्यात कसा आणता येईल याबद्दल मान्यवरांनी वाहक चालक व यांत्रिक कर्मचारी यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितिन गायकवाड यांनी केले तर आभार प्रभाकर झांबरे यांनी मानले . या कार्यक्रमासाठी वाहतूक नियंत्रक नामदेव जगताप , आर . बी . सागर , शिवाजी बांगर , लखन कांबळे , एम . जे . भालेकर , हे उपस्थित होते तर कार्यक्रम पार पाडण्यासाठी यांत्रिक कर्मचारी वाहक चालक आदींनी परिश्रम घेतले.

 
Top