Views


*मोहेकर महाविद्यालयात जिजाऊ जयंतीनिमित्त व्याख्यान संपन्न*

कळंब/प्रतिनिधी 

शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय आणि अंतर्गत तक्रार निवारण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 12 जानेवारी 2023 रोजी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त सभागृहामध्ये 'माझी सुरक्षा माझ्या हाती' या विषयावर ॲड. भाग्यश्री मुंडे यांचे व्याख्यान झाले.त्यांनी महिला आणि सुरक्षाविषयक कायदे, मोबाईलचे दुष्परिणाम, पोस्को कायदा, दैनंदिन  
मुलींची जीवनपद्धती या विषयावर मार्गदर्शन केले. 
सुरुवातीस शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरूजी,राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद  
यांच्या प्रतिमेचे पूजन केले. 
     इतिहास विभागाच्या डॉ. वर्षा सरवदे यांनी स्वामी विवेकानंद आणि मासाहेब जिजाऊ यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. तसेच प्रा. अंजली मोहेकर मॅडम यांनी मुलींनी सकारात्मक दृष्टिकोन अंगी बाळगून ध्येयवादी बनलं पाहिजे. स्वतःचा शारीरिक मानसिक आरोग्य जपणं गरजेचं आहे. तसेच आई-वडिलांचं महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे. सगळे आवडते छंद जोपासावेत सामाजिक बांधिलकी नैतिक मूल्यांचे पालन करावे हीच खरी त्या दिवसाची सार्थकता ठरेल तसेच स्त्री
 
Top