*कळंब च्या पोलीस ठाण्याच्या प्रभारी पदी रवींद्र गायकवाड रुजू!*
कळंब /प्रतिनिधी
बीड येथील सायबर सेल विभागात मधून आलेले रवींद्र गायकवाड यांची नियुक्ती कळंबच्या पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरिक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे तर त्यांनी सोमवारी (दि . १७) रोजी कळंब पोलिस ठाण्याचे सुत्रे हाती घेऊन
अतुल पाटील यांच्या कडून पदाचा पदभार स्वीकारून कामकाजास सुरुवात केली आहे .
कळंब पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांच्या कारकिर्दीत शहरात व परिसरात अवैध धंदे , अवैध वाहतूक ,अस्ताव्यस्त पार्किंग , हाणामाऱ्या , गुंडगिरीचा चांगलाच आळा बसवला होता .त्याचबरोबर मराठा क्रांती मोर्चा चे नियोजन यशस्वीरित्या केल्याबद्दल त्याचेच फलित म्हणून त्यांना पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी बढती म्हणून उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी दिली तर त्यांच्या जागी उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक रामेश्वर खानाळ यांना कळंब पोलिस ठाण्याचे पदभार दिले तर त्याचे शहरात काही मन रमेना म्हणून त्यांनी आपल्या बदलीसाठी जोर लावून अखेर त्यांनी बदली करून घेतली . पोलीस निरिक्षक रामेश्वर खानाळ यांची बदली जालना येथे नुकतीच झाली आहे . त्यांच्या जागी बीड येथील सायबर सेल विभागात आपली अनोखी ओळख निर्माण करून पहणारे क कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांची कळंब पोलीस ठाण्याच्या प्रभारी पदी नियुक्ती केली .
कळंब शहरात व परिसरात मटका जुगार आदी अवैध धंदे , अवैध वाहतूक , बस स्थानकात वरती होणारी टवाळखोरी , हाणामाऱ्या ,खिसे कापू , चोर्या , आठवडी बाजारातील मोबाईल चोर , बाजारपेठेतील टवाळखोरी , अस्ताव्यस्त पार्किंग अशा अनेक गोष्टी सध्या कळंब शहरवासीयांना भेडसावत आहे . याकडेही नवनियुक्त प्रभारी पोलीस निरीक्षक कसे पाहणार? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे . तर ठाण्यात येणाऱ्या तक्रारींचा निपटारा निपक्षपातीपणाने होते की नाही हे पण येणाऱ्या काळातच ठरणार आहे . या सर्व गोष्टीकडे कळंब वासीयातून मोठ्या अपेक्षा ने पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्याकडे पाहिले जात आहे . येणाऱ्या काळात शहरांमध्ये पूर्णपणे गुंडगिरीला व टवाळ खोरी ला आळा बसतो का नाही हे येणाऱ्या काळात पहावे लागणार आहे . येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील नंबर एक ची शिवजयंती कळंब शहरात होत आहे . या शिवजयंतीचे नियोजन नवनियुक्त प्रभारी पोलीस निरीक्षक कसे अवैध धंद्यावर अंकुश ठेवतात याकडे शहरा सह परिसरातील महिलांन सह नागरिकांनी तसेचसर्वांचे लक्ष लागले आहे .