Views
*विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करण्यासाठी विज्ञान प्रदर्शने आवश्यक - शिक्षणाधिकारी (माध्यमिक) गजानन सुसर*


उस्मानाबाद/प्रतिनिधी 


विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत होण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाची आवश्यकता असून विज्ञान शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांमधील जिज्ञासा वृत्ती वाढवावी असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) गजानन सुसर यांनी शुक्रवार ( ता.२७) रोजी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी काढले. 
उस्मानाबाद येथील विद्यामाता हायस्कूल उस्मानाबाद येथे आयोजित केलेल्या ५० व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या विज्ञान प्रदर्शनामध्ये उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांचे २४, माध्यमिक शिक्षकांचे २४, प्राथमिक शिक्षकांचे ८ व माध्यमिक शिक्षकांचे ८ असे एकूण ६४ प्रयोग सहभागी झाले होते. या कार्यक्रमात शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुधा साळुंके व विद्यामाता हायस्कूलचे प्राचार्य फादर जॉयल पीटर पेन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षणाधिकारी रावसाहेब मिरगणे यांनी केले. याप्रसंगी उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) शिवाजीराव फाटक, उपशिक्षणाधिकारी (योजना) गजानन वाघमारे, गटशिक्षणाधिकारी उस्मानाबाद सय्यद असरार, गटशिक्षणाधिकारी तुळजापूर मेहरून्नीसा इनामदार, विज्ञान पर्यवेक्षक तारेख काझी, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक दत्तात्रय थेटे, शिक्षण विस्तार अधिकारी बालाजी यरमूनवाड, चंद्रकांत चिलवंते, दैवशाला शिंदे, दैवशाला हाके इत्यादींनी उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमांमध्ये स्वागत गीत व विज्ञान गीत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सारोळा येथील विद्यार्थ्यांनी केंद्रप्रमुख राजाभाऊ गिरी यांच्या संगीत संयोजनात सादर केले. विज्ञान प्रदर्शनाच्या पहिल्याच दिक्शी शहरातील शाळांमधील २००० विद्यार्थ्यानी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिला विज्ञान अध्यापक मंडळ, तसेच कार्यक्रमासाठी गठीत केलेल्या विविध समित्या, विद्यामाता हायस्कूल उस्मानाबाद या शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संतोष माळी यांनी केले.


 
Top