Views


*कळंब येथे दहा जानेवारी रोजी पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा*


कळंब/प्रतिनिधी 


कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने मंगळवार दिनांक 10 जानेवारी रोजी पत्रकार पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. हा सोहळा शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात सकाळी साडेअकरा वाजता होणार असून सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी केले आहे.
     कळंब तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार वितरण सोहळ्याचे चोविसावे वे वर्ष असून यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख मंगेशजी चिवटे, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार जी पारकर ,टीव्ही नाईन चॅनल चया अँकर निकिता पाटील, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख, राजकीय विश्लेषक अभय देशपांडे, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. प्राचार्य डॉ. अशोक दादा मोहेकर हे उपस्थित राहणार आहेत.
      या दिवशी पुस्तक प्रकाशन, मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे ही आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी केले आहे.

 
Top