Views


*आचलेर ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित उपसरपंचपदी प्रणाली राजेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड*


लोहारा/प्रतिनिधी


आचलेर ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित उपसरपंचपदी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या पत्नी प्रणाली राजेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आचलेर येथील ग्रामपंचायत कार्यालयात दि.6 जानेवारी 2023 रोजी नवनिर्वाचित उपसरपंच निवडीचा कार्यक्रम अध्यासी अधिकारी राजेंद्र माळी व ग्रामविकास अधिकारी एस.एन. मातोळे यांच्या उपस्थितीत पार पडला. नवनिर्वाचित सरपंच सौ.कांताबाई सुभाष सोलंकर यांची जनतेतून सरपंच म्हणून निवड केली होती.यावेळी उपसरपंच म्हणून प्रणाली राजेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी सरपंच,उपसरपंचासह नुतन सदस्य सिध्दु गोपने,लखन चव्हाण,कुसुम पुजारी,उमादेवी बायस,गंगुबाई कलबुटगे, अमोल पुजारी, यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी अशोक पाटील,सुभाष सोलंकर,भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, गुरुसिंग बायस, दस्तगीर पटेल, बालासिंग बायस,सुरेश खंडाळकर,सुनिल पुजारी,अनिल कासार, राहुल माने,विष्णु लोहार,गोविंद चव्हाण,ज्ञानेश्वर उपासे,अमोल मदने,अशोक माळगे,अमिर शेख,हरीबा पुजारी, रमेश पुजारी, प्रदिप पुजारी,शिवराज माळगे, सुदेंद्र परळकर, आप्पास कांबळे,मल्लीनाथ कदारे, मल्लीनाथ पाटील, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top