Views


*कळंबे येथे पत्रकार दिनानिमित्त जांभेकर यांना पत्रकार मंडळ व्हाइस मीडिया कडून अभिवादन*

कळंब/प्रतिनिधी 

कळंब येथे बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कळंब तालुका पत्रकार मंडळ व्हाइस मीडिया संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
अधिकवृत्त असे की, बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त कळंब येथे जांभेकर यांच्या प्रतिमेस तालुका पत्रकार मंडळ व व्हॉईस मीडीया यांच्या पत्रकारांकडून अभिवादन करण्यात आले. यावेळी पत्रकार मंडळाचे तालुका कार्याध्यक्ष धनंजय घोगरे , व्हॉईस मीडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष अमर चोंदे, कळंब पत्रकार मंडळ उपाध्यक्ष पार्श्वनाथ बाळापूरे, तालुका अध्यक्ष शिवाजी बोबडे, उपाध्यक्ष श्रीकांत मडके, रामराजे जगताप,खजिनदार संदीप कोकाटे, जिल्हा संघटक भिकाजी जाधव, माधवसिंग राजपूत, जयनारायण दरक, बंडु ताटे, हनुमंत पाटुळे,रामरतन कांबळे यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.
    पत्रकार दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज आडसुळ यांच्या वतीने पत्रकार दैनिक प्रतिविर चे कार्यकारी संपादक धनंजय घोगरे, अमर चोंदे, समाजसेवक अमर चाऊस, हनुमंत पाटुळे , श्रीकांत मडके, यांचा सत्कार करण्यात आला.
 
Top