Views


*कन्हेरवाडी येथे आनंद मेळावा साजरा; चिमुकल्यांनी भरवला बाजार पंचेचाळीस हजार रुपये उलाढाल !*.                                          


कळंब/प्रतिनिधी 



 तालुक्यातील कन्हेरवाडी येथे जि.प. प्रशालेत आनंद मेळावा आज शनिवार दिनांक 7/1/2023 रोजी आयोजित करण्यात आला विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहार कळावा व मुलांना शैक्षणिक  ज्ञाना बरोबरच व्यावहारिक ज्ञान प्राप्त व्हावे  मुलांच्या विचारांची व्यावहारिक जडणघडण व्हावी विद्यार्थ्यांना खरेदी विक्री याचा अंदाज बांधता यावा भविष्यात शिक्षणातुन बाहेर पडल्यावर आपल्या जीवनात काहीतरी नवीन व्यवसाय फायदेशीर राहील व अनुभव यावा तसेच नफा तोटा किती याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना यावा हा हेतू समोर ठेवून शाळा व्यवस्थापन, मुख्याध्याप, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या संकल्पनेतून.व ग्रामपंचायत, सरपंच, उपसरपंच, शालेय शिक्षण समिती सदस्य व ग्रामस्थ सर्वच्या सहकार्याने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला यावेळी पालेभाज्या,फळे, खाद्यपदार्थ महिलांसाठी संक्रांतीचे साहित्य मांडण्यात आली होती आनंद मेळाव्याची सुरुवात सरपंच ॲड.रामराजे जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष कपिल कवडे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आली यावेळी अनंत पाटिल,अच्युत शिंदे, बळिराम जाधव, पत्रकार रामराजे जगताप,उप सरपंच विजय कवडे,ग्रा.प सदस्य उदय मोरे,माजी सरपंच वसुदेव सावंत, बाळासाहेब कवडे, राजेंद्र सरवदे,प्रदिप खंडागळे, मुख्याध्यापक घोंगडे व शिक्षक दिपक चाळक, परमेश्वर वाघमोडे, संतोष ठोंबरे, नारायण झोरी आणी शिक्षीका साधना झाल्टे,आशा कंगळे, गाढवे मॅडम, सुषमा हंडिबाग व ग्रामस्थ उपस्थित होते तसेच गावातील पालक, महिला, तरुण तरुणीने भेट देऊन व खरेदी करून चक्क पंचेचाळीस हजार रुपयेची उलाढाल झाली हा आनंद मेळावा दुपारी एक वाजेपर्यंत बाजार चालला या पुढे ही असेच चांगले उपक्रम राबवुन गावाचे नाव रोशण होईल असे ग्रामस्थामधुन बोलले जात आहे व गावातील ग्रामस्थांनी उत्सपुर्तपने सहकार्य करुन हा आनंद मेळावा संपन्न झाला.

 
Top