*कळंब पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन संपन्न*
कळंब/प्रतिनिधी
महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त कळंब पोलिस ठाण्याच्या वतीने मंगळवार (दि. 03)रोजी 10.00 ते 11.10वा.दरम्यान कळंब पोलीस स्टेशन यांच्यातर्फे महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त कळंब पोलिस उपविभागीय अधिकारी एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रास्त्र माहितीपर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणामध्ये शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील एनसीसी विभाग व विद्या भवन हायस्कूल येथील एनसीसी विभाग विद्यार्थी सहभागी झाला होते . या प्रशिक्षणा दरम्यान कळंब पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक अतुल पाटील व एनसीसीचे विभाग प्रमुख लेफ्टनंट डॉ. पावडे के. डब्ल्यू. यांनी वेगवेगळ्या शस्त्रांची माहिती दिली. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी थर्ड ऑफिसर आप्पासाहेब वाघमोडे,अरविंद शिंदे, संदीप सूर्यवंशी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय व विद्या भवन हायस्कूल येथील एनसीसी विभागातील 59 विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते.या वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण नेहरकर, पोलिस उपनिरीक्षक रामहरी चाटे पोलीस , पोलीस हवालदार बबन गलांडे, पोलीस नाईक एस के मायंदे, पोलीस हवालदार अण्णासाहेब खोबरे, पोलीस कॉन्स्टेबल खंडेराव माळवे, महिला पोलिस नाईक राजश्री जावळे, पोलीस नाईक महादेव मुंडे, पोलीस कॉन्स्टेबल युवराज चेडे, पोलीस नाईक शिवाजी राऊत,महिला पोलीस कॉन्स्टेबल पत्तेवार.आदी पोलीस स्टेशन कळंब येथील अधिकारी, अंमलदार हजर होते.