Views


*व्हॉइस ऑफ मीडिया ची कळंब तालुका कार्यकारणी जाहीर तालुकाध्यक्षपदी शिवाजी बोबडे निवड तर उपाध्यक्षपदी श्रीकांत मडके,रामराजे जाधव यांची निवड*


 कळंब/प्रतिनिधी 

 कळंब तालुका पत्रकार संघाच्या कार्यालयात सोमवार(दि.०२) दुपारी तीन वाजता व्हॉइस ऑफ मीडिया ची कार्यकारणी जाहीर करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे व कार्याध्यक्ष 1रहीम शेख २ अमर चोंदे यांना पुष्पगुच्छ देऊन करण्यात आली व्हॉइस ऑफ मीडिया ही राष्ट्रीय पातळीवर काम करणारी पत्रकार संघटना असून या पत्रकार संघटनेची कळंब तालुक्याची कार्यकारणी आज जाहीर करण्यात आली. तालुकाध्यक्षपदी शिवाजी बोबडे तर कार्याध्यक्ष म्हणून चेतन कात्रे यांची निवड करण्यात आली, देशातील 20 प्रमुख संपदाकांनी एकत्रित इतिहास या राष्ट्रीय संघटनेची स्थापना केली आहे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे राष्ट्रीय अध्यक्ष संजय आवटे राज्याध्यक्ष राजा माने हे आहेत.व्हाईस ऑफ मीडिया या संघटनेचे कार्य खालील मुद्याना धरून करणार आहे त्यामध्ये पत्रकारांसाठी घर,

पत्रकारांच्या मुलांचे शिक्षण,

 अपघात ,भविष्य पुंजी बाबत तरतूद,पत्रकाराने नवे तंत्रज्ञान शिकायचे,पत्रकारांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्याचे नियोजन,पोर्टल ऑनलाईनला शासकीय सवलती मिळवून देणे,ज्यांची पत्रकारितेत १० वर्ष झालीत त्यांना अधिस्वीकृती कार्ड देणे, पत्रकार आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांसाठी सर्व प्रकारची मोफत आरोग्य सेवा
पत्रकार जोपासत असलेल्या विशेष छंदासाठी शिष्यवृत्ती.अन्य देश, अन्य राज्य यासाठी पत्रकार यांचे खास अभ्यास टूर इत्यादी असे कार्य प्रामुख्याने करणार आहेत.देशातील 22 राज्यात या संघटनेचा विस्तार झाला असून जवळपास 18 हजार पत्रकार या संघटनेची जोडले गेले आहेत. तालुक्यापासून ते ग्रामीण भागापर्यंत या संघटनेचा विस्तार करण्यात येत असून निवडी बद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
कळंब तालुका व्हाईस आँफ मिडिया ची कार्यकारणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष-शिवाजी बाबुराव बोबडे 
कार्याध्यक्ष-चेतन बंजरगराव कात्रे 
उपाध्यक्ष - 1) श्रीकांत भारत मडके 
 उपाध्यक्ष -2) रामराजे भास्कर वामन जगताप 
सचिव - बाळासाहेब शिवाजी जाधवर 
सरचिटणीस - रसुल दस्तगीर तांबोळी  
खजिनदार /कोषाध्यक्ष - संदिप अशोक कोकाटे 
कार्यवाहक- अमोलसिंह दतूसिंह चंदेल 
संघटक -वैभव राव साहेब पाटील
प्रसिद्धी प्रमुख - दिपक नागनाथ माळी 
मार्गदर्शन सल्लागार - परमेश्वर पालकर, ॲड.मनोजकुमार सुभाष थोरात सदस्य - बिलाल अब्दुल रहमान कुरेशी, ओंकार धनंजय कुलकर्णी, शिवप्रसाद बियाणी,हनुमंत पाडुळे, सलमान मुल्ला, रनजीत गवळी ,बालाजी सुरवसे, कांबळे, राजकुमार हनुमंत आडसूळ, राम रतन कांबळे यांची नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी सतीश टोणगे ( विश्वस्त कळंब तालुका पत्रकार संघ अध्यक्ष),परमेश्वर पालकर (माझी अध्यक्ष कळंब तालुका पत्रकार संघ) धनंजय घोगरे( कळंब तालुका मराठी पत्रकार मंडळ कार्याध्यक्ष) हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भिकाजी जाधव तर आभार प्रदर्शन श्रीकांत मडके यांनी केले या कार्यक्रमासाठी कळंब तालुक्यातील व ग्रामीण भागातील पत्रकार उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी अमर चोंदे (व्हाईस ऑफ मीडिया जिल्हा कार्याध्यक्ष) व शिवप्रसाद बियाणी यांनी परिश्रम घेतले.

 
Top