Views


*भुम येथील उपलेखापरीक्षकासह रामकुंड चा गटसचिव लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात*

उस्मानाबाद/ प्रतिनिधी 


भूम येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था म., रामकुंड च्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सदस्य पदासाठी अर्ज केला असता सदरचा अर्ज बाद होऊ न देण्यासाठी व सहकार्य करण्यासाठी 1)भाऊसाहेब रावसाहेब हुंबे,वय 54वर्षे पद :- उपलेखापरीक्षक -2, कार्यालय - लेखापरीक्षक श्रेणी 2, सहकारी संस्था,भूम ता. भूम जि. उस्मानाबाद(वर्ग-3)
2) जाकिर हुसैन अब्दुल रऊफ काझी. पद - गटसचिव, कार्यालय - विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था म., रामकुंड ता. भुम जि. उस्मनाबाद.यांना मंगळवार(दि.03) रोजी 2000/- रूपयांची लाच घेताना उस्मानाबाद लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले तक्रारदार यांनी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था म., रामकुंड च्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सदस्य पदासाठी अर्ज केला होता अर्ज बाद न करण्यासाठी यातील अलोसे 01 व 02 यांनी पंचासमक्ष 2,000/- रुपयांची मागणी करुन स्वीकारण्याचे मान्य केलें व आलोसे क्र.01 यांनी पांचासमक्ष 2,000/- रूपये स्वतः स्वीकारले असता ताब्यात घेण्यात आले आहे.
   सदर कार्यवाही ही औरंगाबाद लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे,अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांच्या
मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद लाचलुचपत विभागाचे पोलिस उप अधीक्षक प्रशांत संपते, पोलिस निरीक्षक अशोक हुलगे, पोलीस अमलदार अर्जुन मारकड, शिधेश्वर तावसकर, विष्णु बेळे, जाकेर काझी, अविनाश आचार्य, चालक दत्तात्रय करडे यांनी केली 



*लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर खालील नंबरवर संपर्क साधावा*
*कार्यालय 02472 222879*
टोल फ्री क्रमांक.1064

 अशोक हुलगे ,पोलीस निरीक्षक,ला.प्र. वि. उस्मानाबाद मो.न.8652433397

 मा. संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद.मो.न.9923023361

मा.विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. औरंगाबाद. मो. न.8788644994

मा. प्रशांत संपते , पोलीस उप अधीक्षक,ला.प्र. वि. उस्मानाबाद मो.न.9527943100
 
 
Top