Views


*कळंब आगारामध्ये सुरक्षितता पंधरवाडा मोहिमेस प्रारंभ!*


कळंब/ प्रतिनिधी 


येथील बस आगारात रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत तसेच केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे दि. ११ ते २५ जानेवारी या पंधरवाड्याच्या कालावधीत राज्यभर आयोजन केले जात आहे. 
सदर कार्यक्रमाचे उदघाटन बुधवार ,११ जानेवारी रोजी दुपारी ११ वाजता कळंब आगारामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल पाटील यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कळबं आगाराचे आगार प्रमुख मुकेश कोमटवार हे होते तर प्रमुख पाहुणे विभागीय लेखा अधिकारी वैशाली कोरडे ,प्रा . मोहन जाधव , श्री मायंदे हे होते. यावेळी कार्यक्रमासाठी कार्यशाळा अधीक्षक बालाजी भारती , आगार लेखाकार एम जे भालेकर ,पी . सी . लखन कांबळे , आदी उपस्थित होते यावेळी सडक सुरक्षा जीवन सुरक्षा सुरक्षितता मोहीम याविषयी मान्यवरांनी वाहक-चालक व प्रवाशांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गोरे यांनी केले तर आभार वाहक बालाजी भारती यांनी मानले . कार्यक्रमासाठी वाहक चालक व यांत्रिक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
 
Top