Views


*कळंब शहरामध्ये चार ठिकाणी छापा मारून पोलिसांनी ४ लाख ५५ हजार गुटखा जप्त करून ४ जण ताब्यात घेतले*


*कळंब पोलिस उपविभागीय अधिकारी एम रमेश यांची कार्यवाही*


कळंब /प्रतिनिधी

कळंब शहरात महाराष्ट्र शासनाचे प्रतिबंधित घालून दिलेल्या गुटख्याची खुलेआम अवैद्य मार्गाने विक्री होत असल्याचे गुप्त माहिती हे कळंब पोलिस उपविभागीय अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक एम रमेश यांना गुप्त माहिती मिळाली 
या गुप्त माहितीची शहानिशा करून मंगळवार (दि.१०) रोजी शहरातील मदिना चौक येथील शुभम किराणा दुकानावर छापा मारत १९,०९० रुपयाचे गुटखा जप्त करून श्रीनिवास सत्यनारायण करवा (वय.५०) रा जूने सोनार गल्ली कळंब यांना अटक केली. लागलीच सावित्रीबाई फुले शाळेच्या पाठीमागे करवा यांच्या घराची झडती घेत छापा मारून घरांमधून १,८७,०२०/ रूपयाचे गुटखा जप्त करून शुभम श्रीनिवास करवा (वय.२५)रा. जुने सोनार गल्ली कळंब यास ताब्यात घेतले.तसे याच कारवाई च्या वेळी सावित्रीबाई फुले शाळेच्या बाजूला असलेल्या गोडाऊन वर छापा मारून झडती घेतली असता गोडाऊन मधून १,४९,१७०/ रूपयाचे अवैध गुटखा जप्त करून मनोज झुंबरलाला मालपाणी (वय. ५०) व रुपेश विष्णुदास मालपाणी (वय.३६) दोघे रा. खाटीक गल्ली कळंब यांना ताब्यात घेतले असे तीन ही कारवाई दरम्यान कळंब पोलिसांनी ४ आरोपींना ताब्यात घेत ३,५५, २८०/ रुपयांचे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेले अवैध गुटखा जप्त केला 

सदर कार्यवाही ही उस्मानाबाद पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक नवनीत काॅंवत यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब पोलिस उपविभागीय अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी नेतृत्वा मध्ये पोलिस उपनिरीक्षक जी.पी . पुजरवाड, महिला पोलिस उपनिरीक्षक श्रीमती साबळे, पोलीस नाईक शेख, पोलिस कर्मचारी अंभोरे, मंदे , अंभोरे, चापोना चव्हाण यांनी केली कळंब पोलिसांच्या कार्यवाही ने कळंब शहरातील व तालुक्यातील अवैध माफिया मध्ये दहशत निर्माण झाली आहे.



 
Top