Views


*चोरांनी लाखो रुपये किंमतिचे दोन ट्रॅक्टर चोरले आणि ट्रॅक्टरसह 3 अरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात*


 उस्मानाबाद/प्रतिनिधी

चोरांनी लाखो रुपये किंमतीचे दोन ट्रॅक्टर चोरले आणि उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेने ट्रॅक्टरसह आरोपी ताब्यात घेतले.

कळंब शहरा लगत असलेल्या जावळे यांच्या शेता मध्ये अक्षय शंकर जावळे यांच्या मालकीचे गोठ्या समोर उभा असलेला अंदाजे 2,50,000/- रूपये किंमतीचे सोनालिक ट्रॅक्टर क्रं एम.एच. 25 एच 1969 रोटाव्हेटर सह 11 डिसेंबर 2020 रोजी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता.

तालुक्यातील हावरगाव येथील आण्णासाहेब भास्कर कोल्हे यांच्या शेता मध्ये उभा असलेला अंदाजे 5,65,000/- रुपये किंमतीचे सोनालिका ट्रॅक्टर क्रं एम.एच. 25 .एस . 7260 हा दोन फळी नांगरा सह दिनांक04/01/2023 रोजी अज्ञात चोरांनी चोरून नेला होता अक्षय जावळे व आण्णासाहेब कोल्हे यांच्या फिर्यादीवरून कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा क्रं 11/2023 व014/2023 भा.दं.सं कलम -379अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला‌ 


    सदर गुन्हा तपास दरम्यान उस्मानाबाद पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी- अंमलदार हे सोमवार (दि.23) रोजी कळंब तालुक्यामध्ये गस्तीस असताना. वरील गुन्ह्यातील आरोपी कळंब येथील असल्याचे पथकास गोपनीय माहिती मिळाली की, कळंब येथील-1) विकास बापुराव भालेकर वय 29 वर्षे रा. तादंळवाडी ह.मु. कळंब 2)मुस्तफा नासीर सय्यद वय 22 वर्षे रा. शेरेगल्ली कळंब या दोघांनी केला असून.

 उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. गुन्ह्याच्या अनुशंगाने त्यांच्याकडे चौकशी करून खाक्या दाखवितास त्यांनी दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली. व गुन्हातील मुद्देमाल हा नेकनुर, ता. जि. बीड येथे राहणारे मोबीन सय्यद यास विक्रि केले असल्याचे कबूल केले त्यावर पथकाने नेकनुर, ता.जि.बीड येथे जावुन मोबीन सय्यद, रा. नेकनुर, ता.जि.बीड यास ताब्यात घेतले. त्याचेकडून निळया रंगाचा न्यू हॉलंड कंपनीचे ट्रॅक्टर क्रं.एम.एच.25 अेएस 2019 ,एक महिंद्रा कंपनीचा लाल रंगाचा रोटाव्हेटर, लोखंडी नांगर, दोन लहान व दोन मोठे टायर, लोखंडी टप असा एकुण 4,18,000 ₹ चा माल हस्तगत केला. सदर मुद्देमाला बाबत स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकाने माहिती प्राप्त केली असता सदरबाबत पोलीस ठाणे कळंब येथे गुरनं.11/2023 व गुरनं.14/2023 भादवि कलम 379 तसेच लातुर जिल्हातील मुरुड पोलीस ठाणे गुरनं.292/2022 भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे माहिती मिळाली. अशा प्रकारे स्था.गु.शा.च्या पथकाने उस्मानाबाद जिल्ह्यातील चोरीच्या 02 गुन्ह्यासह लातूर जिल्ह्यांतील 01 असे एकुण 3 चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा केला आहे.

सदर कार्यवाही ही. उस्मानाबाद पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे चे पोलिस निरीक्षक श्री. यशवंत जाधव, पोलिस उपनिरीक्षक श्री. संदीप ओहोळ, पोलीस अंमलदार विनोद जानराव, प्रदीप वाघमारे, फरहान पठाण, नितीन जाधवर, अजित कवडे, बबन जाधवर, महेबुब अरब,सुनिल मोरे यांच्या पथकाने केली आहे.
 
Top