Views

*त्याग व समर्पणाची भावना रासेयो शिबिरातून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते, प्राचार्य अनिगुंठे*

कळंब/प्रतिनिधी

देशप्रेम, शिस्त व समाजाशी कसे वागायचे  ? याची शिकवण राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे श्रमसंस्कार शिबिर देते, आपल्या कार्यावर निस्सीम प्रेम केले तर आपापल्या क्षेत्रात स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करण्याची संधी मिळते तसेच विद्यार्थ्यांमध्ये जिद्द, परिश्रम,ध्यास आणि एकाग्रता हे चार गुण असतील तर त्यांना निश्चित यश मिळते, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या श्रमसंस्कार शिबरातून विद्यार्थ्यांमध्ये त्याग समर्पणाची भावना निर्माण होते असे आवाहन   प्राचार्य डॉ. व्ही ,एस अनिगुंठे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद आणि शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या मौजे डिकसळ येथील  शिबिराच्या समारोप समारंभ प्रसंगी दिनांक 22 जानेवारी 2023 रोजी केले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ, व्ही, एस, अनिगुंठे कला महाविद्यालय नांदूरघाट तर प्रमुख उपस्थिती मध्ये दत्तात्रय वाघ सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती कळंब  ,उपप्राचार्य प्रो हेमंत भगवान व प्रो.मुकुंद गायकवाड होते व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून,ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर उपस्थित होते.दत्तात्रय वाघ यांनी मार्गदर्शन करताना असे सांगितले की रासेयो शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण भागाशी नाळ जोडण्याची व श्रमाची जाणीव निर्माण करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते, राष्ट्रीय सेवा योजना विभाग विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव निर्माण करतो तसेच विद्यार्थ्यांच्या सुप्त शक्तींचा शोध लावत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करतो असे आहवान त्यांनी केले, तर अध्यक्षीय समारोपात डॉ.अशोकराव मोहेकर यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या या शिबिरातून विद्यार्थ्यांमध्ये श्रमसंस्कार निश्चितच निर्माण झाले असतील असा आशावाद बाळगला तसेच मोबाईलचा वापर जास्तीत जास्त एक तास करावा तो पण गुगलवर चांगले शैक्षणिक साहित्य शोधण्यासाठी करावा असे  मार्गदर्शन केले. या कार्यक्रमांमध्ये वर्ष 2019-20 या कालावधीमध्ये सर्वोत्कृष्ट  कार्यक्रम अधिकारी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा तर्फे दिला जाणारा पुरस्कार प्राप्त प्रा. ईश्वर राठोड  यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. नामानंद साठे यांनी तर प्रास्ताविक, डॉ.मीनाक्षी जाधव व आभार प्रदर्शन लेफ्टनंट डॉ. के.डब्लू पावडे यांनी केले.या वेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ .संदीप महाजन, प्रो. दादाराव गुंडरे प्रा. मोहन जाधव,डॉ श्रीकांत भोसले डॉ. विश्वजित मस्के,प्रा अर्चना मुखेडकर, प्रा.सुशील जमाले डॉ.समाधान चंदनशिवे, प्रकाश गायकवाड,हनुमंत जाधव, अरुण मुंढे,विनोद खरात,अमोल सुरवसे, अर्जुन वाघमारे, दिलीप शिंदे, कमलाकर बंडगर,रमेश पवार, व रासेयो स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Top