Views


*उस्मानाबाद शहरात जिंवत काडतुसा सह देशी पिस्तुल जप्त*

उस्मानाबाद प्रतिनिधी

उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सोमवार दि.12 रोजी गुप्त बातमीदारामार्फत मिळाल्या माहिती वरून उस्मानाबाद शहरातील बायपास रस्त्यालगतच्या हाॅटेल साईकमल समोर अज्ञात इसम अवैध पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. याची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव यांनी उस्मानाबाद पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना माहिती दिली

उस्मानाबाद पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस नवनीत काॅंवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव यांनी हाॅटेल च्या परिसरात सापळा रचून सायंकाळी ७:०० वाजता संशयित इसमास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने स्वतः चे नाव किशोर लिंबराज माळी वय- ३४ रा. चिलवडी ता.उस्मानाबाद असे सांगितले पथकाने त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या जवळ देशी बनावटीचे पिस्तूल व २ जिवंत काडतुसे अंदाजे किंमत १७,४००/- रूपये किंमतीचे काडतुसांसह पिस्तुल मिळाली.त्यास अटक करून आनंदनगर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा क्रं ३६१/२०२२ प्रमाणे शस्त्र कायदा कलम ३/२५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला सदर प्रकरणाचे पुढील तपास आनंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक खरड हे करत आहेत.

सदरची कार्यवाही उस्मानाबाद पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक नवनीत काॅंवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव, पोलिस उपनिरीक्षक संदीप ओहोळ, पोलिस अंमलदार समाधान वाघमारे, विनोद जानराव, फरहान पठाण, नितीन जाधवर, अजित कवडे, बबन जाधवर यांनी केली 
 
Top