Views
*आठ वर्षापासून फरार असलेली महिला अंबी पोलिसांचे ताब्यात*           उस्मानाबाद/प्रतिनिधी 

गेल्या आठ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देतत असलेल्या महिलेस अंबी पोलिसांनी भूम येथील अलम प्रभू यात्रे मधून मोठ्या शिताफीने अटक केली सदर आरोपी वर
     भुम तालुक्यातील अंबी पोलिस स्टेशन गु.र.नं. 20/2014 भा.दं.वि. कलम 306, 498, 34 मध्ये दाखल गुन्ह्यातील महिला आरोपी गेल्या 8 वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत असलेली 
आरोपी सारिका गुलच्या काळे उर्फ सारिका नितीन चव्हाण वय 32 वर्ष रा. गुंडेगाव ता. अहमदनगर जि.अहमदनगर हीस गुप्त बातमीदारांमार्फत प्राप्त माहिती विश्लेषण करून अटक करून परंडा न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्रासह हजर केले आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली


सदर कार्यवाही ही उस्मानाबाद पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली भूम पोलिस उपविभागीय अधिकारी दिनकर डंबाळे यांच्या नेतृत्वाखाली अंबी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष खांडेकर यांनी सापळा रचून ताब्यात घेतले सदर कार्यवाही ही अंबी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष खांडेकर, महिला पोलिस नाईक सबीया शेख, रामकिशन कुंभार, पोलिस शिपाई संदीप चौगुले, अशोक पव्हणे यांनी केली सदर कार्यवाही केल्यामुळे आंबी पोलिसांचे कौतुक होत आहे. 
Top