Views


*कळंब तालुक्यात विविध ठिकाणी सत्ता परिवर्तन*

कळंब /प्रतिनिधी

ग्रामपंचायत निवडणुकी त सर्वत्र सत्ता परिवर्तनाची लाट आलेली दिसली. सर्व प्रमुख ग्रामपंचायतीत या निकालाने सत्ताधाऱ्यांना धोबी पछाड मिळाली आहे जबरदस्त रस्सीखेच असलेले तालुक्यातील डिकसळ ग्रामपंचायत च्या सत्तेत परिवर्तन झाले

महाविकास आघाडीला थेट सरपंच पदासह १३जागा मिळाल्या तर भाजप पुरस्कृत पॅनलला ४ जागांवर समाधान मानावे लागले यांना मोठा धक्का बसला असून ३० ग्रामपंचायत पैकी भाजप ९ महा विकास आघाडीला ८ ठाकरे सेना ८ शिंदे सेना तीन राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस प्रत्येकी एक ग्रामपंचायतवर विजय मिळाले आहे.

तांदळवाडी रस्त्यावरील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) हॉलमध्ये मंगळवारी (दि.२०) सकाळी ९ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरी १४ गावे तर दुसऱ्या फेरीत १४ गावे आणि तिसऱ्या फेरीत २ गावांचा समावेश होता. मतमोजणीच्या स्थळी निवडणूक विभागाने नियोजन बध तयारी करण्यात आली होती. जशी जशी मतमोजणी झाली विजयी उमेदवार कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला. तालुक्यातील बाबळगाव येथील प्रभाग २ मधील दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाली त्यामुळे टॉस करण्यात आले यात प्रभाकर अंगार खे हे विजयी झाले तर शिराढोण येतील प्रभाग क्रमांक ४
 मध्ये टॉस करण्यात आले यात अशोक धाकतोडे यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने विजय घोषित करण्यात आले.



 
Top