Views


*नमस्ते धाराशिव साप्ताहिक वृत्तपत्राचे संपादक संदीप कोकाटे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी*

*पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची कळंब तालुका पत्रकार संघाची मागणी*

कळंब/प्रतिनिधी 

  हावरगाव तालुका कळंब येथील साप्ताहिक नमस्ते धाराशिव व युट्युब चॅनलचे संपादक संदीप अशोक कोकाटे यांच्यावर हावरगाव येथे अतुल आबासाहेब कोल्हे अविनाश चौधरी व विष्णू यादव कोल्हे यांनी मागील बातमीचा राग काढून आर्वच्या भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली या लोकांपासून पासून संदीप व त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका आहे यासाठी संबंधित हल्लेखोर व्यक्तीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल व्हावा व कारवाई व्हावी अशी मागणी कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने एम रमेश सहायक पोलीस अधीक्षक पोलीस उपविभागीय कार्यालय कळंब यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे हे निवेदन पोलीस उपनिरीक्षक पुजारवाड यांनी स्वीकारले या निवेदनावर कळंब तालुका पत्रकार संघाचे विश्वस्त सतीश (बप्पा) टोणगे पत्रकार, दिलीप गंभीरे ,शितल घोंगडे ,परमेश्वर पालकर ,अकीब पटेल ,संभाजी गिड्डे ,माधवसिंग राजपूत,जय नारायण दरक बंडू ताटे यांच्या सह्या आहेत

 
Top