Views


*चार हजाराची लाच स्वीकारणारा ग्रामसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात*
 

उस्मानाबाद/प्रतिनिधी 

 ग्रामीण स्तरावर लाचखोरी किती बळावली आहे याचा प्रत्यय लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत असलेल्या कारवाया पाहून कळते. एका ग्रामसेवकाला चार हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.सुयज्ञ वशिष्ठ मैंदाड,वय 44 वर्षे 

पद,ग्रामसेवक ,सजा कुमाळवाडी अंतर्गत आळणी आणि तुगाव, पंचायत समिती कार्यालय उस्मानाबाद जि. उस्मानाबाद यांनी तक्रारदार ( वय ६५) यांचे राहते घर असलेल्या गायरान जागेची तक्रारदार यांचे नावे नोंद घेण्यासाठी तसेच घरकुल मंजुरीसाठी आरोपी लोकसेवक नामे सुयज्ञ वशिष्ठ मैंदाड यांनी तक्रारदाराकडे 10,000 रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 4,000/- रुपये लाच रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली. त्यानंतर संबंधित ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १९ डिसेंबर रोजी ताब्यात घेतले असून गुन्हा नोंद करण्यात आला‌.


सदर कार्यवाही ही संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद,विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. औरंगाबाद. यांच्या मार्गदर्शनाखाली विकास राठोड, पोलीस निरीक्षक,ला.प्र. वि. उस्मानाबाद यांनी पोलीस अंमलदार इफ्तेकार शेख ,मधुकर जाधव, विशाल डोके,सचिन शेवाळे यांनी केली 

 
Top