Views*ज्येष्ठ नागरिकांच्या कार्याबद्दल महादेव महाराज आडसुळ ईटकुरकर यांचा सन्मान*


कळंब/प्रतिनिधी 

महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेस्काॅम मुंबई 42 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने दक्षिण मराठवाडा प्रादेशिक विभागाच्या वतीने 12 डिसेंबर 2022 या दिवशी अंबाजोगाई येथील निसर्गरम्य व पुण्य पावन भूमी असलेल्या मुकुंदराज देवस्थानच्या विस्तीर्ण व विशाल भजन सभागृहामध्ये, मागील अनेक वर्षापासून जेष्ठ नागरिकांसाठीचे उत्कृष्ट सांघिक कार्य करत असल्याबद्दल धाराशिवजिल्हा जेष्ठनागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ ईटकुरकर यांचा माजी मंत्री पंडितराव दौंड, दक्षिण विभागाचे अध्यक्ष बी. आर पाटील, ज्येष्ठ नागरिक हेल्पलाइन जनसेवा फाउंडेशन चे प्रकल्प व्यवस्थापक स्मितेश शहा पुणे यांच्या शुभहस्ते व फेस्कॉम च्या राज्य महिला विभाग अध्यक्षा डॉ.मायाताई कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मुंदडा, विभागीय उपाध्यक्ष डॉ. दामोदर थोरात, विभागीय सचिव प्रभाकरजी कापसे, विभागीय संघटक सचिव डि.के. कुलकर्णी, राज्य गुणवंत कामगार संघटनेचे सचिव अच्युतराव माने, ज्येष्ठ नागरिक संघाचे आंबेजोगाई 
कार्याध्यक्ष आनंत जगतकर, ज्ञानदा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष बंडू ताटे या सर्वांच्या व्यासपीठावरील प्रमुख उपस्थितीमध्ये सन्मानप्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
  यावेळी परभणी, लातूर, बीड, उस्मानाबाद या विभागातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या व महिला संघाच्या पदाधिकाऱ्यांची विशेषतः महिला पदाधिकाऱ्यांची संख्या लक्षणीय असी उपस्थिती होती.

 
Top