Views


*प्रियंका भांडे याची राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेसाठी निवड*


कळंब /प्रतिनिधी 

नुकत्याच राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धा कोल्हापूर येथे पार पडल्या. या स्पर्धेत शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील इयत्ता बारावी मध्ये शिकत असलेली कुमारी प्रियंका भांडे हीची राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली. ही स्पर्धा दिनांक 19 डिसेंबर 2022 रोजी कोलकत्ता येथे खेळली जाणार आहे. क्रीडाशिक्षक उत्तरेश्वर गायकवाड क्रीडा शिक्षिका सरस्वती वायबसे यांनी मेहनत घेतली. तिच्या या यशाबद्दल ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळ्याचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पवार, उपप्राचार्य डॉ.सतीश लोमटे, प्रा. पंडित पवार , प्रा. नंदकिशोर टेकाळे तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या
 
Top