Views


*कळंब बस स्थानकातील उडणाऱ्या धुरळ्याचा बंदोबस्त करा आस्थापनाधारकांची विभाग नियंत्रकाडे मागणी!*


कळंब /प्रतिनिधी 

येथील बस स्थानकातील उडणाऱ्या धुरळाच्या लोटामुळे प्रवाशासह आस्थापनाधारक त्रस्त झाले असून या धुरळाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी विभाग नियंत्रकाकडे सर्व आस्थापनाधारकांनी एका निवेदनाद्वारे आगारप्रमुख मुकेश कोमटवार यांच्या मार्फत केली आहे . येथील बस स्थानकात गेल्या पंधरा वर्षापासून डांबरीकरण केले गेले नाही या बस स्थानकात अनेक मोठ-मोठे खड्डे पडल्याने या खड्ड्यांमध्ये रा .प .प्रशासन माती मिश्रित मुरूम टाकून खड्डे बुजवले जातात या खड्ड्यात दगड माती असल्याने काही कालांतराने येणाऱ्या जाणाऱ्या बसमुळे त्याचे धुळीचे लोट उठतात तर काही वेळेस खड्ड्यातील दगड बसच्या चाकाखाली आल्याने अनेक प्रवाशांना हाकणाक उडणाऱ्या दगडाचा मार खावा लागत आहे .या धुळीमुळे अनेक प्रवाशासह आस्थापनाधारकांना टी . बी . दृश्य रोग उद्भव्वु शकतो त्याचप्रमाणे आस्थापनाधारकाने विक्रीसाठी ठेवलेल्या मालावर धूळ साचली जाते या मुळे रोगराई पसरण्याची भीती प्रवाशातून व्यक्त केली जात आहे . त्याचप्रमाणेया धुळीमुळे आस्थापनाधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे . या उठणाऱ्या धुळीचा रा .प . प्रशासनाने तात्काळ कायमस्वरूपी १५ जानेवारीपर्यंत बंदोबस्त करावा अन्यथा सर्व आस्थापनाधारक २६ जानेवारी रोजी रा .प . प्रशासनाच्या कार्यालयासमोर उग्र आंदोलन करण्याचा इशाराही आस्थापनाधारकांनी या निवेदनाद्वारे दिला आहे . या निवेदनावर विलास मुळीक, दत्तात्रय उमाप , एम .जे .लोकरे , बी .एच .चोरघडे , अकिब पटेल, मुकीब पटेल , दिलीप चालक , सोमनाथ सुरवसे ,करीम पठाण , अंकुर चालक ,हरीश धमावत , प्रसाद करवलकर आदींच्या स्वाक्षऱ्या या निवेदनावरती आहे

 
Top