Views


*विद्याभवन हायस्कुलने याही वर्षी नवोदय परिक्षेत आपला दबदबा कायम*कळंब/प्रतिनिधी 

येथील विद्याभवन हायस्कुलने याही वर्षी नवोदय परिक्षेत आपला दबदबा कायम ठेवला असून शाळेचे दोन विद्यार्थी आनखि प्रतिक्षा यादीत नवोदय प्रवेशासाठी पात्र झाले आहेत. 

या परिक्षेत प्रवेशास पात्र म्हणून अर्णव ईश्वर भोसले ,तन्मय मनोज कदम , या दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांनी एप्रील २०२२ मध्ये पात्रता प्रवेश परिक्षा दिली होती. 
या यशस्वी विद्यार्थ्यांना सुवर्णा गव्हाणे, मंगल माने , विशाल पवार यांचे मार्गदर्शन लाभले होते. त्यांचे या यशाबद्धल सर्वत्र कौतुक होत आहे . तर त्याचे शाळेत पालका समावेत मानचिन्ह देऊन आज दि. १९ रोजी शाळेत सत्कार करण्यात आला . 
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब बारकुल, सचीव डॉ. अशोकराव मोहेकर, मुख्याध्यापक एस. व्ही. पवार, उपमुख्याध्यापीका एस.बी.शिंदे , रोहीणी मोहेकर ( शिंदे ) यांनी अभिनंदन केले आहे.

 
Top