Views


*गणेश विसर्जनाच्या दिवशी भर पावसात उपविभागीय पोलिस अधिकारी एम रमेश यांचे बंदोबस्त* 

कळंब/प्रतिनिधी


           होय! सण - उत्सव म्हणलं की, पोलिस बंदोबस्त आलाच की, प्रत्येक सण आपण घरी राहून साजरा करतो, आणि तो सण सुरक्षित पार पडावा या करीता पोलीस यंत्रणा रस्त्यावर उभी असते, 
शुक्रवार (दि.09) रोजी ही अगदी अशाचप्रकारे श्री गणेशाच्या विसर्जनाच्या कार्यक्रमाला कसल्याही प्रकारचे गालबोट न लागू देता, आणि भर पावसात सर्वांना गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत आनंद घेता येईल अशा पद्धतीने कळंब शहरातील पोलीस प्रशासन व नगर परिषद अगदी सज्ज होते. 

पोलिस प्रशासनाच्या व नगर परिषद कळंब यांच्या कौतुकास्पद कामगिरीमुळे सर्व शहरास गणेश विसर्जनाचा मनमुराद आनंद घेता आला. यामुळे शहरातील एक सुजाण नागरिक म्हणून... आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे की, जनतेच्या बंदोबस्तासाठी 24 तास उभा असणारा आपला हा रक्षक,कळंब उपविभागीय पोलीस अधिकारी मा. एम.रमेश साहेब,कळंब पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.यशवंत जाधव साहेब,त्याचप्रमाणे उपविभागीय अधिकारी सौ.अहिल्या गाठाळ,तहसीलदार मा.मुस्तफा खोंदे साहेब आजही नित्यनेमाने आपल्या सेवेत होते.  
Top