*जगदगूरू नरेंद्राचार्य महाराज यांचा मार्गदर्शन सोहळा नागरिकांना लाभ घेण्याचे अवाहन*
कळंब/प्रतिनिधी
अनंत श्री विभुषित जगदगुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचे दोन दिवशीय समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा . मंगळवार दि. १३ व बुधवार १४ सप्टेंबर सकाळी ठिक ९.०० वाजता माऊली माहेर आश्रम ,शिमुरगव्हान ता.पाथरी जि.परभणी येथे होणार आहे.
संस्थानच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम
जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या अंधश्रद्धा निर्मुलन उपक्रम अंतर्गत मार्गदर्शन व दर्शन सोहळा संपन्न होणार आहे. संस्थानाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात.जसे ग्राम स्वच्छता अभियान,शैक्षणिक व वैद्यकीय उपक्रम ,आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे पुनर्वसन, महिला सक्षमिकरण,आपातकालीन मदत, कायदे विषयक साक्षरता अभियान असे विविध उपक्रम राबविले जातात.
जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज यांचे मार्गदर्शन शिबिर
जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात.यामध्ये नाणिजधाम येथे शालेय विद्यार्थ्यांना विनामुल्य विद्यालयीन ते महाविद्यालयीन मोफत शिक्षण दिले जाते.सामाजिक अध्यात्मीक,शैक्षणिक तसेच निराधार महिलांना शिलाई मशिन वाटप,शेतकऱ्यांना कृषि साहित्य वाटप,गाय म्हेस, शेळी वाटप असे अनेक उपक्रम राबविले जातात . कोरोना काळात मुख्यमंत्री व प्रधानमंञी निधीमध्ये एक कोटी मदत करण्यात आली असुन अपघात ग्रस्तांसाठी विनामुल्य तीस रूग्णवाहीका हायवेवरती सेवा देत आहेत.
या अनुषंगाने अध्यात्मिक उपक्रमाअंतर्गत शिमुरगव्हाण येथे जगदगुरू नरेंद्राचार्य महाराजांचे मंगळवार दिनांक १३ व बुधवार १४ सप्टेंबर रोजी उपपीठ माऊली माहेर आश्रम शिमुरगव्हाण ता.पाथरी जि.परभणी येथे प्रत्यक्ष समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
शिमुरगव्हाण येथे जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज यांचे प्रवचन सोहळा
अनंत श्री विभुषित जगदगुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचा समस्या मार्गदर्शन व प्रवचन सोहळ्याचे आयोजन दिनांक १३ व १४ सप्टेंबर रोजी सकाळी ठिक ९.०० वा कोरोना नंतर दोन वर्षानंतर हा सोहळा होत असल्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.दोन वर्षानंतर सोहळा होणार असल्यामुळे सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे.
अध्यात्माची परीभाषा कळली की जीवनाचा कायापालट होतो ,हे अध्यात्म जगदगुरू नरेंद्राचार्य आपल्या रसाळ वाणिने सांगतात,स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या समस्या मार्गदर्शन व प्रवचन सोहळ्याचा भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे अवाहन मराठवाडा उपपीठाचे व्यवस्थापक सुमित लंके , पीठ प्रमुख गणेश मोरे ,तर उस्मानाबाद जिल्हयातील भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा निरिक्षक संजय खंडागळे , उस्मानाबाद जिल्हा सेवा समितीचे अध्यक्ष संतोष केसकर ,उस्मानाबाद जिल्हा युवा अध्यक्ष रामजी सगर ,उस्मानाबाद जिल्हा महिलाध्यक्ष जोती ताई हिबारे , जिल्हा सेवा समितीचे प्रासिध्दी प्रमुख विलास मुळीक यांनी केले.