Views


*उपजिल्हा रुग्णालयात विविध प्रकारच्या सुविधा निर्माण करुन देण्याची काँग्रेस आय कडून आरोग्यमंत्री कडे मागणी*कळंब/प्रतिनिधी

शहरातील उपजिल्हा रुग्णालयात विविध प्रकारच्या सुविधा निर्माण करुन देण्याची मागणी कळंब तालुका काँग्रेस आयच्या वतीने आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कळंब तालुक्यात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा कळंब तालुका काँग्रेस आय च्या वतीने सत्कार करण्यात आला.
कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात सामान्य नागरिकांना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनामध्ये कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रस्तावित जागेचे हस्तांतरण करुन नूतन 100 बेडच्या इमारतीस निधीची तरतूद करण्याची मागणी असून सोनोग्राफी सेंटर, सी टी स्कॅन, एम आर आय सेंटर, या सुविधा तात्काळ सुरु करण्यात याव्या तसेच 
भुलरोगतज्ञ, हृदयरोगतज्ञ, पोटविकार तज्ञांची जागा त्वरित भरण्यात यावे जेणे करुन सामान्य नागरिकांचे हाल होणार नाही.तालुक्यातील नागरिकांसाठी ट्रामा केअर सेंटर सुरु करण्यात यावे तसेच चालू ओ पी डी मध्ये तज्ञ डॉक्टर यांनी हजर राहून रुग्णांना सेवा देण्यात यावी.सध्यस्थिती उपलब्ध होत नसणारा औषध पुररवठा सुरळीत करण्यात यावा .
रुग्णांना रेफर करण्याचे प्रमाण कमी करुन उपजिल्हा रुग्णालयातच उपचार करण्यात यावा, स्त्री रोग तज्ञांची नेमणूक करण्यात यावी, ब्लड स्टोरेज युनिट सुरु करण्यात यावे, आणि रुग्णासोबत त्यांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय करण्यात यावी आशा विविध मागण्यांचे निवेदन कळंब तालुका काँग्रेस आय च्या वतीने आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना देण्यात आले असून या निवेदनावर तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार, जिल्हा उपाध्यक्ष भागवत धस, शहर कार्याध्यक्ष सचिन गायकवाड, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष शहाजहान शिकलकर, कळंब उस्मानाबाद विधान सभा युवक अध्यक्ष शशिकांत निरफळ, कळंब उस्मानाबाद विधान सभा युवक उपाध्यक्षध्यक्ष रोहित कसबे, शहर सचिव सुरेश मस्के आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 
Top