Views


*डॅाक्टरांच्या कामांचे मुल्यांकन पैशात करता येत नाही -डॅा रमेश भराटे*

कळंब/प्रतिनिधी


राष्ट्रपती डॅा ए पी जे अब्दुल कलाम व सह्याद्री फाऊंडेशन लातुर यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य क्षेत्रातील अतुलनीय कामगिरी बद्दल लातुर चे प्रसिद्ध श्वसनविकार तज्ञ तथा गायत्री हॅासपीटल लातुर चे संचालक डॅा रमेश भराटे यांचा जनरल अरुणकुमार वैद्य राष्ट्रीय पुरस्कार देवुन गौरव करण्यात आला.तसेच नुकत्याच झालेल्या निवडणुकीत डॅा रमेश भराटे हे बहुमताने राज्य ऊपाध्यक्ष म्हणुन निवडुन आल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी त्यांनी मार्गदर्शन केले.कुठलिही महामारी आल्यानंतर डॅा आपल्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता रात्रंदिवस काम करुन रुग्णांचा प्राण वाचवत असतात.म्हणुन कोरोना सारख्या महामारीवर आपण नियंत्रण मिळवले असे डॅा रमेश भराटे यांनी नमुद केले.या वेळी डॅा सचिन इंगळे यांना आय एम ए तर्फे राष्ट्रीय मानपत्र दिल्याबद्दल त्यांचा पण सत्कार करण्यात आला.सह्याद्री हॅासपीटल लातुर चे संचालक व प्रसिद्ध न्युरोसर्जन डॅा हनुमंत किनीकर यांचा पण राष्ट्रीय पुरस्कार देवुन गौरव करण्यात आला.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी श्री स्वामी हे ऊपस्थित होते .या कार्यक्रमासाठी शहरातील बरेच प्रतिष्ठित नागरिक ऊपस्थित होते. या कार्यक्रमाचें सुत्रसंचालन प्रसिद्ध वक्ते डॅा गणेश बेळंबे यांनी केले.

 
Top