उस्मानाबाद/प्रतिनिधी
तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवात आजपासून चौथ्या माळेच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची ललित पंचमी निमित्त श्री देवीजींची नित्योपचार पूजेनंतर रथ अलंकार महापूजा बांधण्यात आली.
ललीता पंचमी निमित्त आज रथ अलंकार पूजा मांडण्यात येते. भगवान सुर्यनारायण यांनी त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ श्री भवानी मातेस दिला. याप्रमाणे रथ अलंकार अवतार पूजा मांडण्यात येते, अशी आख्यायिका सांगितली जाते.
दररोज नियमित श्री तुळजाभवानी देवीजींचे विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात. यात, उद्या दि. 30 रोजी मुरली अलंकार महापूजा, दि. 01 ऑक्टोबर रोजी शेषशाही अलंकार महापूजा,दि. 02 ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि दि. 03 ऑक्टोबर रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहेत.
तत्पूर्वी काल (बुधवार) रात्री तिसऱ्या माळेच्या दिवशी अभिषेक पूजेनंतर देवीला वस्त्र अलंकार चढविण्यात आला. त्यानंतर धूप आरती करण्यात आली. रात्री श्री तुळजाभवानी मंदिरात गरुड वाहनावरून छबिना मिरवणूक काढण्यात आली. प्रक्शाळ पूजा झाली.