Views




*कळंब येथे दांडिया गरबा शिबिर संपन्न*


कळंब/प्रतिनिधी 

शहरात दांडीया गरबाचे दी.20 ते 24 सप्टेंबर या कालावधीत फ्युजन डान्स ड्रामा आणि योग स्टुडिओ सांस्कृतिक संघ कळंब आयोजित नवरात्र महोत्सव निमित्त दांडिया गरबा नृत्य प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत महिला व मुली यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता पाच दिवस चाललेल्या या शिबिरात गरबा व दांडिया नृत्यातील विविध प्रकार शिकवले गेले. कळंब येथील प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक फ्युजन डान्स अँड ड्रामा अकॅडमी चे संचालक आशिष झाडके यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. यात शिवानी झाडके यांचे सहकार्य लाभले.या शिबिरात सहभागी सर्वांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.सागर मुंडे यांचे मोलाचे सहकार्य या शिबिरास लाभले.

 
Top