Views





*कळंबमधून मराठा आरक्षणाचा महामोर्चा, भर पावसात मराठा समाजचे एल्गार*

*व्यासपीठावर सात मुलींची भाषणे झाली .
महामोर्चांच्या वेळी अनेक समाज बांधवांनी पिण्याचे पाणी अल्पोपहार व्यवस्था करण्यात आली होती* 

*मोर्चा वेळी पोलिसांनी चौक बंदोबस्त ठेवला होता* 

*मोर्चामध्ये अनेक राजकीय पक्षाचे नेते महिला पुरुष विद्यार्थी यांचा मोठ्या संख्येने समावेश होता*

कळंब/प्रतिनिधी 


मराठा आरक्षणासाठीचा लढा पुन्हा एकदा मराठवाड्याच्या भूमीतूनच सुरु झाला आहे. कळंब येथे आज (सोमवार) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. ओबीसी कोट्यातून न्याय्य आरक्षण द्यावे या मागणीसाठी साधारण एक लाख मराठा बांधव, भगिनी या मोर्चामध्ये सहभागी झाले. राज्यात पहिल्या ५८ मोर्चानंतर व कोरोना कालखंडानंतर मराठा समाजाला ओबीसी मधूनच संविधानिक आरक्षण द्यावे, ही ठोस मागणी घेऊन उस्मानाबाद जिल्ह्य़ातील कळंब शहरात सोमवारी लाखो मराठा समाज बांधवांनी मोर्चा काढला. यावेळी समाजाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळंबच्या उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांच्या मार्फत मुलींनी व महिलांनी खालील मागण्याचे निवेदन दिले.
1. स्वातंत्र्यपूर्व काळात मराठवाडा विभाग हा निजाम राजवटीमध्ये म्हणजेच हैद्राबाद स्टेटमध्ये समाविष्ठ असलेला भाग होता व मराठवाडयातील शेती करणाऱ्या कुणबी समाजाला मराठा असे संबोधले गेले. देशाच्या स्वातंत्र्यानंतर मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा होवून मराठवाडा विभाग हा 1 वर्षे 1 महिना व 2 दिवसांनी भारतातील एकसंघ महाराष्ट्रामध्ये त्याचा समावेश झाला. वास्तविक मराठा, कुणबी व कुणबी मराठा हे वेगळे नसून एकच आहेत, हे अनेक वेळा सिध्द झालेले आहे. मराठा समाज मुलत: आर्थिक दृष्टया व शैक्षणिक दृष्टया मागास असून राज्य शासनाने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी वेग वेगळे आयोग स्थापन केलेले होते, व त्या प्रत्येक आयोगाने त्यांचा अहवाल सादर केलेला आहे. ज्यामध्ये मा.राणे समिती, मा.गायकवाड आयोगाने सादर केलेल्या अहवालात विदर्भ व खानदेशातील कुणबी, कुणबीमराठा व मराठा हे वेगवेगळे नसुन एकच असल्याचे निरिक्षणे नोंदविलेले आहेत. त्याबाबत समाजामध्ये जाती व्यवस्था असून देखील पुर्वी पासून कुणबी,कुणबी-मराठा, लेवा पाटील व मराठा ही एकच जात असल्याने रोटी-बेटीचा व्यवहार पंरपरेने होत आलेला आहे, ही बाब देखील उपरोक्त नमुद केलेल्या सर्व अहवालामध्ये नमुद आहे. तसेच पुर्वीच्या हैद्राबाद राज्यातील आणि आज रोजी कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्यामध्ये असणारा मराठा समाज इतर मागास म्हणून आरक्षणाचा लाभ घेत आहे. केवळ महाराष्ट्र राज्यात सामाविष्ट असणाऱ्या मराठवाडयातील मराठा समाज आरक्षणापासून वंचित आहे त्यामुळे मराठवाडयातील मराठा समाजाचा समावेश ओबीसी सुची मध्ये करणे अत्यंत आवश्यक असून त्यासाठी राज्य सरकारने तातडीने उचीत कार्यवाही करावी.
2. मराठा समाजासाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे मराठा तरूणांच्या उदयोग वाढीसाठी स्थापन झालेले असून, त्याची कर्ज मर्यादा व्याज परताव्यासाठी ५० लक्ष रू. पर्यत करण्यात यावी. 
3. मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहास प्रत्येक जिल्हयाच्या व तालुक्याच्या ठिकाणी मंजुरी देऊन निधीची तरतुद करावी व वार्षिक उत्पन्न् आठ लक्ष रू. पेक्षा कमी असणाऱ्या सर्व मराठा विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करावी.
४ मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न जो पर्यंत निकाली निघत नाही ,तोपर्यंत कोणती ही नोकर भरती करु नये तसेच कोणत्याही निवडणुका पण घेऊ नयेत
वरील प्रमाणे प्रमुख मागण्या तातडीने मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी विशेष लक्ष दयावे यासाठी आज.दि.१९ सप्टेंबर २०२२ रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने कळंब जि.धाराशिव मध्ये एक लाख मराठा समाज बांधव मोर्चा काढुन हे निवेदन उपविभागीय अधिकारी , यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आले .


हा मोर्चा विद्याभवन हायस्कूल येथून सुरुवात होऊन राजमाता जिजाऊ चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक,होळकर चौक येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरबालउद्यान येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून नगरपरिषद शाळा क्रमांक एक येथे पोहोचला नंतर पाऊस सुरू झाला परंतु भर पावसात देखील समाज बांधव आपल्या जागेवर बसून होते,व आरक्षण मिळावे यासाठी घोषणा देत होते.

ह्या मोर्चात जिल्ह्यातील सर्वच भागातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सकाळपासून दाखल होत झाले होते.कोणत्याही राजकीय पक्षाविरोधात घोषणा न देता केवळ आरक्षण समर्थनाच्या तसेच ‘एक मराठा लाख मराठा’ या घोषणा दिल्या गेल्या. या मोर्चात सर्व पक्षीय मराठा समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संस्था, संघटनांचे कार्यकर्ते, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, युवती, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते..

 या मोर्चा साठी सकाळपासूनच गावागावातून मराठा समाजाचे पुरूष, महिला, विद्यार्थी, वयोवृद्ध, वकील, शिक्षक, व्यापारी दाखल होत होते. गगनभेदी घोषणांनी आसंत दणाणून गेला होता.

कळंब तालुका सोडून लातूर, बीड, औरंगाबाद, नांदेड, जालना, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा, तुळजो, उस्मानाबाद, वाशी, लोहारा, नळदुर्ग, आदी भागातून मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. 
  





*हिंदू मुस्लिम समाजाचे सामजिक एकोपा*

*कळंब शहरातून निघालेल्या भव्य आरक्षण महामोर्चा ला कळंब शहरातील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने मोर्च्यामध्ये सहभागी झालेल्या मराठा बांधवांसाठी पिण्यासाठी पाण्याची सोय, बिस्किटे वाटप केले तसेच ठिकठिकाणी अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती.
तसेच मोर्चा रॅली वर गुलाबांच्या फुलांच्या पाकळ्या टाकून पुष्पवृष्टी करण्यात आली व सामाजिक एकजुटीचा संदेश देण्यात आला*



   *चौकट*
महामोर्चाची कार्यक्रमाची सभास्थळी सुरुवात जिजाऊ वंदनाने झाली . यावेळी कु . चेतना काळे , कु . अर्पिता यादव , कु . शिवलीला कानडे , कु . साक्षी बांगर ,कु . अमृता सोनवणे, कु . श्रेया झांबरे, कु . स्नेहल साळुंखे या सात मुलींनी आरक्षणावरती भाषणे दिली . कार्यक्रमाची सूत्रसंचालन व आभार प्राचार्य जगदीश गवळी यांनी केले .

 
           *चौकट*

*सर्व समाजाचा जातीय सलोखा*

या मोर्चात सहभागी झालेल्या मराठा बांधवांना जैन युवक मंडळ जैन समाजाच्या वतीने वतीने चहा , अविष्कार मोबाईल शॉपी यांच्या वतीने मठ्ठा , पाटील मेडिकल यांच्यावतीने केळी ,आझाद ग्रुप यांच्या वतीने पिण्याचे पाणी ,नुराणी अक्वा यांच्यावतीने पिण्याचे पाणी व गुलाबाचे फुल देऊन मोर्चातील मराठा बांधवांचे स्वागत करण्यात आले . गायत्री कॉम्प्युटर व कीर्ती जनरल स्टोअर्स यांच्या वतीने पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती . तर सभास्थळी ॲड. समीर मुल्ला यांच्या वतीने बिस्किटाचे वाटप करण्यात आले .    


      
          *चौकट*


*तगडा बंदोबस्त*

या मोर्चासाठी कुठे अनुचित प्रकार घडू नये म्हणून उस्मानाबाद पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक नवनीत कॉमत, यांनी खूद्द जातीने हजर रहात करडी नजर ठेवून बंदोबस्त साठी कळंबचे उपविभागीय अधिकारी सहाय्यक अधीक्षक एम.रमेश व सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले.६०० पोलिसांसह ५० अधिकाऱ्यांचा फौजफाटा १० पोलीस निरीक्षक, ३७ पीएसआय, व एपीआय, ५५५ पोलीस, दोन दंगल नियंत्रण पथक यावेळी तैनात करून तगडा बंदोबस्त केले.मोर्चा सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षका सह अतिरिक्त पोलीस अधीक्षक व पोलीस उपाधीक्षक ,पोलीस निरीक्षक ,सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस कर्मचारी या महामोर्चावर नजर ठेवून तळ ठोकून होते 
मोर्चातील समाज बांधवांना कुठलीही वैद्यकीय सुविधा कमी न पडू देण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयामार्फत मोर्चा ठिकाणी आठ रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या होत्या तर उपजिल्हा रुग्णालयात चार रुग्णवाहिका ह्या तत्पर सेवेसाठी तयार ठेवण्यात आल्या होत्या .









 
Top